लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : जागतिक महिला दिनानिमित्त मलकापूर नगरपालिका व आगाशिवनगर येथील सुमन मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत महिलांना फुलझाडांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांसह मान्यवरांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.
कोरोना महामारीवेळी स्वतःची पर्वा न करता, इतरांची सेवा करणार्या आशा सेविका, महिला कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी यांची जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते माझी वसुंधरा अंतर्गत महिलांना मोफत फुलझाडांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेेंद्र यादव, शिक्षण व नियोजन सभापती प्रशांत चांदे, महिला बालकल्याण सभापती शकुंतला शिंगण, उपसभापती स्वाती तुपे, नगरसेवक सागर जाधव, नगरसेविका कमलताई कुराडे, नंदाताई भोसले, गीतांजली पाटील, पूजा चव्हाण, विद्याताई थोरवडे, जयंत कुराडे, शहाजी पाटील, हणमंत शिंगण, मेडिकल असोसिएशनचे सागर पाटील यांच्यासह आशा सेविका, कर्मचारी आणि महिला उपस्थित होत्या.
फोटो :