सातारा : शिरगावहून साताऱ्याकडे येत असताना लिंब गावच्या हद्दीत रिक्षा उलटून झालेल्या अपघातात एक महिला जखमी झाली. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.सीमा भरत पवार (वय ४०,रा. केसरकर पेठ, सातारा) असे जखमी महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी सीमार पवार या शिरगावहून रिक्षाने साताऱ्याकडे येत होत्या.
लिंब गावच्या हद्दीतील महामार्गाच्या पुलाखाली अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा उलटली. यामध्ये सीमा पवार या जखमी झाल्या. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.आर्थिक चणचणीतून एकाची आत्महत्या
लिंब, ता. सातारा येथे आर्थिक चणचणीतून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजता उघडकीस आली. सुनील लक्ष्मण सोनमळे (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सुनील सोनमळे यांनी रात्री राहत्या घरात तुळईला गळफास घेतल्याचे घरातल्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी सोनमळे यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. आर्थिक चणचणीतून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.
वीज चोरी पकडल्याने वायरमनच्या खुनाचा प्रयत्नवडूज : वीज चोरी पकडल्याने संबंधितांनी वायरमनच्या खुनाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना निसळबेंद (वडूज) ता. खटाव येथे घडली. याप्रकरणी दोघांवर वडूज पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.बहिऱ्या उर्फ संतोष बाबुराव जाधव, नितीन बाबुराव जाधव (रा. निसळबेंद) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निसळबेंद (वडूज) येथील डीपीतील फ्यूज दुरुस्त करण्यासाठी वायरमन रावसाहेब साळुंखे गेले होते.
डीपीतील फ्यूज दुरुस्त करताना हिंगणे रोड येथील घोडेवाला डीपी नादुरुस्त असल्याने कोळी वस्तीवरील डीपीचा सप्लाय तात्पूरता घोडेवाला डीपीला जोडला. त्यावेळी तेथे किशोर साळुंखे, शरद पवार, उमेश साळुंखे आणि रावसाहेब साळुंखे हे उपस्थित होते. त्याठिकाणी काम करताना वडूजचे अर्जुन गोडसे यांनी फोन करून सांगितले की, निसळबेंद येथील डीपीच डिओ गेलेला आहे.
असे समजताच संबंधित वायरमन त्याठिकाणी साडे अकराच्या सुमारास गेले. दुरुस्ती करून येथील डिओ सातत्याने जात असल्याने परिसरात पाहणी केली असता येथील लोक आकडे टाकून वीज चोरी करीत असल्यानेच हा डिओ नादुरुस्त होत होता. या डीपीपासून चौथ्या पोलवर एक आकडा टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तो आकडा काढण्यासाठी त्याठिकाणी ते गेले असता बहिºया जाधव व नितीन जाधव या दोघांनी शिवीगाळ करून त्यांना जबर मारहाण केली. तसेच शासकीय कामात अडथळा आणला.या प्रकरणी वायरमन रावसाहेब साळुंखे यांनी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, या तक्रारीवरून बहिºया उर्फ संतोष जाधव, नितीन जाधव या दोघांवर ३०७, ३५३, ३२३, ५०४, ५०६ व ३४ कलमनाव्ये गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. डी. हंचाटे हे अधिक तपास करीत आहेत.