सातारा : मोठ्या थाटामाटात मंगळवारी आगमन झालेल्या गौरीचे गुरुवारी विसर्जन होत आहे. यानिमित्ताने ओळखीपाळखीच्या महिलांना हळदी-कुंकवाचे नियंत्रण दिले जाऊ लागले आहे. शहरासह ग्रामीण भागातील महिला हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात दंग असल्याचे पाहायला मिळत आहे.
गौरीचे मंगळवारी आगमन झाले. तेव्हापासून सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत होता. सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने बळीराजाही सुखावला आहे. त्यामुळे गौरी गणपती सण उत्साहात साजरे करण्यात आले.
गौरीपूजन बुधवारी होते. यानिमित्तानेच पंचपक्वान, पुरणपोळीच्या गोडाधोडाचे जेवण नैव्यद्य दाखविण्यात आला. नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने पुणे-मुंबईत स्थायीक झालेले मुलं, नातेवाईक घरोघरी आले होते.
गौरीचे विसर्जन गुरुवारी होत आहे. पण तिला निरोप देण्याची मानसिकता महिलांची होत नाही. त्यामुळे दिवसभर हळदीकुंकूचा कार्यक्रम केल्यानंतर रात्री उशिरा विसर्जन केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.