शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दुर्गम भागातील महिलांचे कार्य कौतुकास्पद

By admin | Published: May 25, 2017 11:18 PM

दुर्गम भागातील महिलांचे कार्य कौतुकास्पद

लोकमत न्यूज नेटवर्कलोणंद/म्हसवड : अतिशय दुर्गम भागात काम करून देखील येथील महिला उद्योजक आपला व्यवसायाचा विस्तार करत आहेत, ही बाब अभिमानास्पद व कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्वगार ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या पत्नी चेरी ब्लेअर यांनी येथे काढले. ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या पत्नी व चेरी ब्लेअर फाऊंडेशन फॉर वुमेनच्या संस्थापिका चेरी ब्लेअर यांनी आज माणदेशी फाऊंडेशन म्हसवड च्या लोणंद येथील शाखेस भेटदिली. माणदेशी फाऊंडेशन व चेरी ब्लेअर फाऊंडेशन फॉर वुमेन यांच्या भागीदारी अंतर्गत गेल्या दोन वर्षांत ५५० हून अधिक महिला नवउद्योजिकांना प्रशिक्षण व व्यवसाय साहाय्य देण्यात आले आहे. लोणंद,दुधेबवी,निंभोरे या गावातील महिला उद्योजकांचे कार्य पाहताना वत्यांच्याशी संवाद साधताना चेरी ब्लेअर अक्षरश: भारावून गेल्या.निंभोरेगावातील प्रीती भिसे यांनी माणदेशी बिझनेस स्कुलमधून प्रशिक्षण घेतआपल्या स्वत:च्या आयुष्यात परिवर्तन घडून आणले व आपल्या व्यवसायाच्यानफ्यातून स्वत:चे घर बांधले.त्यांचा हा प्रवास बघून भारावून गेलेल्या चेरी ब्लेअर म्हणाल्या की, ‘तुमच्या कुटुंबाला व तुम्हाला याबाबत अभिमान वाटायला हवा. अशा अद्वितीय व कष्टकरी आईच्या पाठीमागे तिची मुले खंबीरपणे उभी राहतील, अशी मी आशा करते. या सर्व महिलांचे कार्य बघताना मला अत्यंत आनंद होत असून या महिलांना देण्यात येणारे प्रशिक्षण कार्यक्रम कितीमहत्त्वाचे आहे,हे त्यांच्या यशाने अधोरेखित होते.’ दुर्गम भागातील खेड्यांमध्ये वास्तव्य असणाऱ्या महिला देखील आपल्या व्यवसायाचा विस्तार करीत असून त्यांच्याकडे कुठल्याही फॅन्सी डिग्रीज नसूनही त्यांची मुले-मुली एक दिवस लंडन व अमेरिकेत शिकायला येतील, असेही यावेळी त्यांनी सांगितले.सायकलींचे वाटपया सर्वांची प्रगती व वाटचालीचा आढावा घेण्यासाठी व त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सातारा जवळील लोणंद, दुधेबवी, निंभोरे या गावांतील या महिला उद्योजकांना त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. तसेच माणदेशी महिला बँक व माणदेशी फाऊंडेशनच्या लोणंद शाखेला देखील भेट दिली. या दरम्यान त्यांनी या भागातील विद्यार्थींनींनात्यांचे शिक्षण चालू राहावे यासाठी दहा सायकलींचे वाटप केले. चेतना गाला-सिन्हा म्हणाल्या की, ‘उद्योजक महिलांच्या व्यावसायिक गरजांनाअगदी वर्ल्ड बँक ते स्थानिक बँकांपर्यंत प्राधान्य देणे गरजेचे आहे.’