येथील शिक्षण मंडळाच्यावतीने आयोजित गुरूगौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी डॉ. माधव कुमठेकर, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. माधव कुमठेकर म्हणाले, ज्या संस्थेने मला घडवले त्या संस्थेचा पुरस्कार मिळतोय याचा आनंद आहे. सुजाण नागरिक बनवण्याचे शिक्षकाचे काम सध्याच्या परिस्थितीत दुरावतेय. या स्पर्धात्मक युगात पदवीबरोबरच कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे.
यावेळी प्राचार्य रमणलाल शहा, डॉ. माधव कुमठेकर यांना डॉ. रा. भा. देवस्थळी स्मृती शैक्षणिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीच्या अमित कुलकर्णी यांना डॉ. रा. गो. प्रभुणे अमृतमहोत्सवी शिक्षण संस्थाभूषण पुरस्काराने तर डॉ. राजाराम कुंभार यांना गौरवग्रंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अस्मिता पोतदार व प्रशांत दिवेकर यांना आदर्श शिक्षक, सुरेखा महिशी व अनघा परांडकर यांना आदर्श निवृत्त मुख्याध्यापक, डॉ. मधुरा जगताप व हेमंत देशपांडे मिरज यांना आदर्श प्राध्यापक, प्रशांत कुलकर्णी व विष्णू कुलकर्णी यांना उत्कृष्ट नाट्यकर्मी, किसन वाघमारे व चंद्रकांत काळे यांना आदर्श शिक्षक, स्नेहल वाळिंबे व अविनाश भांदिग्रे यांना आदर्श शिक्षक प्राथमिक विभाग, गणेश इनामदार व प्रकाश वाघमारे यांना आदर्श सेवक तर रोहिणी चव्हाण व अथर्व जोशी यांना आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बाळासाहेब कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सुवर्णा देशपांडे व जीवन थोरात यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव राजेंद्र लाटकर यांनी आभार मानले.
फोटो : ०८केआरडी०१
कॅप्शन : क-हाड येथे शिक्षण मंडळाच्या वतीने डॉ. माधव कुमठेकर यांना बाळासाहेब कुलकर्णी, चंद्रशेखर देशपांडे, राजेंद्र लाटकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.