कातरखटाव : कातरखटाव परिसरातील शिंगाडवाडी, काचकी मळा, मानेवाडी येथे जलयुक्त शिवाराची नाला बंडिंग व मातीचे बांध घालण्याचे काम जोरात सुरू आहेत, त्यामुळे रखडलेल्या पाणलोट विकासाला गती मिळाली आहे.गेल्या चार वर्षांत कातरखटाव ग्रामपंचायतीच्या अंतर्गत वादामुळे विकासाला चांगलीच खीळ बसली होती. वेगवेगळ्या कामाचा निधी येऊनही कामाचे श्रेय कोणी घ्यायचे यावरून पाणलोट कामे रखडून पडत होती. त्यामुळे निधी परत जायचा, नवनिर्वाचित सरपंच राजेंद्र बागल सदस्यांच्या सहकार्याने रखडलेली पाणलोटची कामे सुरू केली. पाणलोट विकासाच्या आराखड्यानुसार प्रथम गावाच्या पूर्वेकडील शिंगाडवाडीच्या शिवारात जवळपास ११० हेक्टर जागेत पावसाचे पाणी आडवण्यासाठी बांध बांधण्यात आले. त्याच पद्धतीने मायणी कातरखटाव मार्गानजीक असणाऱ्या माळरानावर अशाच प्रकारचे बांध तयार करण्यात आले आहेत. या कामामुंळे गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न थोडा फार सुटेल, असा विश्वास कृषी अधिकारी त्रिकुटे यांनी व्यक्त केला आहे.या कामाचे उद्घाटन सरपंच राजेंद्र बागल यांनी केले. यावेळी बांध विभागाचे प्रतिनिधी जी. डी. वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य अजित सिंहासने, लक्ष्मण शिंगाडे, हिंदुराव बोडके, पोपट मोरे, प्रताप बाडके, आकाराम बोडके, पाणलोट समितीचे अध्यक्ष दिगांबर बागल, सचिव रवी कुंभार, अशोक बागल, विजय बागल, सुभाष बागल व शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कातरखटाव परिसरात एकूण दहा गांवात कामे सुरू आहेत. रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील.लोकसहभागाने ही कामे लवकरच पूर्णत्वास येतील- राजेंद्र बागलसरपंच, कातरखटाव
नाला बंडिंगचे काम पूर्णत्त्वाकडे
By admin | Published: February 13, 2015 8:56 PM