शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

जिल्ह्यात मानवी विकासाबाबतचे काम समाधानकारक : जलाजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:54 AM

सातारा : ‘जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अतिशय चांगले असून आरोग्य, अन्न सुरक्षा, मनरेगा, अंगणवाडी याबाबतीतही उल्लेखनीय काम करून मानवी विकासाबाबत चांगले काम झाले आहे,’ असे गौरवोद्गार राष्ट्रीय मानव अधिकारी आयोगाच्या जलाजा यांनी काढले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी ...

ठळक मुद्देआढावा बैठक : जिल्ह्यात शासकीय यंत्रणांच्या कामाचे कौतुकजिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा

सातारा : ‘जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अतिशय चांगले असून आरोग्य, अन्न सुरक्षा, मनरेगा, अंगणवाडी याबाबतीतही उल्लेखनीय काम करून मानवी विकासाबाबत चांगले काम झाले आहे,’ असे गौरवोद्गार राष्ट्रीय मानव अधिकारी आयोगाच्या जलाजा यांनी काढले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) अविनाश शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी सिंघल म्हणाल्या, ‘माण, खटाव, कोरेगाव तालुक्यांचा काही भाग अवर्षण प्रवण क्षेत्र असल्याने पाण्याचे दुर्भीक्ष हा नेहमीचाच प्रश्न होता; पण गेल्या तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होऊन पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

अंगणवाडीतील पोषण आहार, कुपोषण निर्मूलनासाठी उपयुक्त असून, त्यासाठी अधिकाधिक लहान मुलांना अंगणवाडीत येण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सातारा हा राज्यातील पहिला हागणदारी मुक्त जिल्हा असून, आता घनकचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणार आहे.’‘जिल्हा प्राथमिक शिक्षणात राज्यात दुसºया क्रमांकावर असून, आम्ही शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपाय अवलंबले आहे,’ अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी दिली.जलजा म्हणाल्या, ‘स्त्री-पुरुष जन्मदराचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त आणि शहरात कमी आहे त्यावर उपाय करावेत. घनकचरा व्यवस्थापनासाठी पंचायत समिती स्तरावर लक्ष द्यावे.’गुन्हे निकालाचे प्रमाण ४२ टक्केजिल्ह्यात तीस पोलिस ठाणे, अठरा आऊटपोस्ट आहेत. जिल्ह्यातील गुन्हे निकाली काढण्याचे प्रमाण ४२ टक्के आहे. महिलांच्या सुरक्षतेसाठी निर्भया पथक, प्रतिसाद पथक सुरू करण्यात आले आहे. यामुळे गुन्हे मोठ्या प्रमाणात आटोक्यात आले आहेत,’ अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.