पाटण येथे जागतिक महिलादिनी अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका पाटील, बकाजी निकम, ग्रंथपाल संजय इंगवले, राजेंद्र पवार, प्रदीप साळवेकर, दत्तात्रय कवडे यांची उपस्थिती होती.
वंदना सावंत म्हणाल्या, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात अनेकांनी धास्ती घेतली होती. कोरोनाविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. शासनाच्या सर्व प्रशासकीय यंत्रणा अस्वस्थ होत्या. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करताना प्रभागात नागरिकांकडून त्रास, अपमान सहन करीत जबाबदारीची जाणीव ठेवून अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांनी काम केले. जागतिक महिलादिनी त्यांचा गौरव होणे गरजेचे आहे.
यावेळी चाळीसहून अधिक अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांचा सत्कार करण्यात आला. त्याबरोबरच वाचनालय परिवाराकडून स्त्रीशक्तीचा जागर करणाऱ्या ग्रंथांचे यावेळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
फोटो : ०९केआरडी०३
कॅप्शन : पाटण येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच आशा सेविकांचा सत्कार पंचायत समितीच्या माजी सभापती वंदना सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.