माणिक डोंगरे मलकापूर : मलकापुरातील युनिक उड्डाणपुलाचे काम सध्या संत गतीने सुरू आहे. वेळेत आर्थिक पूर्तता होत नसल्याने तीन ते सहा महिन्यापर्यंत काहीजणांना पगार मिळत नसल्यामुळे सब कॉन्ट्रॅक्टर्स, ऑपरेटर व काही प्रमाणात लेबरही गायब झाले आहे. त्यामुळे पुलाच्या कामाला गेली दोन महिन्यापासून चांगलाच ब्रेक लागला असून याची स्थानिक लोकप्रतिनिधींनी दखल घेणे गरजेचे आहे.पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या शेंद्रे ते कागल या सुमारे दिडशे किलोमीटर पट्ट्याच्या सहापदरीकरणाच्या प्रस्तावाचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सर्वेक्षण करून अंतीम मास्टर प्लॅन तयार केला होता. त्यामधील शेंद्रे ते पेठनाका एकूण ६७ किलोमीटर या पट्ट्यातील सहापदरीच्या कामांना एक वर्षापूर्वी सुरवातही केली आहे. सहपदरीकरणात मलकापूर जंक्शन येथे २९.५ मीटर रुंदीचा ५.५ मीटर उंचीचा सिंगल पिलरवर आधारित ३.४७ किमी लांबीचा पंकज हॉटेल ते ग्रीन लँड हॉटेल पर्यंत ग्रेड सेप्रेटरसह उड्डाणपूल होणार आहे. काम सुरू झाल्यापासून पहिल्या सहा महिन्यात जुने उड्डानपूल पाडून नव्या पुलाच्या कामास सुरवात केली होती. या उड्डानपूलाच्या सर्वच ९२ पिलरचे कास्टिंग पूर्ण झाले आहे. तर सर्व ९२ पिलर कॕपसह उभे राहिले आहे. अत्याधुनिक दोन गरडर मशिनद्वारे सिगमेंट बसवून पुलाचे एका ठिकाणी ३३ तर दुसऱ्या ठिकाणी २९ असे ६२ गाळे तयार झाले आहेत. कामाची सध्याची गती विचरात घेता उड्डाणपुलाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र गेले महिनाभरापासून पुलाचे काम पूर्वीच्या गतीने होत नसल्याचे दिसून आले. याबाबत अधिकृत सूत्रांकडे चौकशी केली असता, काही विभागातील सुपरवायझर,ऑपरेटर व लेबरचे पगार तीन महिन्यापासून ते सहा महिन्यापर्यंत दिलेले नसल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्यामुळे या पट्ट्यात काम करणाऱ्या सब कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखालील ऑपरेटर, सुपरवायझर व काही लेबर गायब झाले आहेत़. तर काही कामगार बुक्क्याचा मार सहन करून काम करत असल्याचे बोलले जात आहे. शहरातील या महत्त्वाच्या कामात होत असलेली दिरंगाई विचारात घेता, स्थानिक खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुंबई -गोवा महामार्गाच्या कामाची पुनरावृत्तीची शक्यताआहे तेवढ्या अपुऱ्या कर्मचाऱ्यावर सध्या काम सुरू असून, मलकापुरातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलासह महामार्गाच्या कामात दिरंगाई होत आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकूण पिलर ९२, कास्टिंग झलेले ९२, पिलर कॅप तयार झालेले ९२, सिगमेंट बसवून झालेले गाळे ६२, सिगमेंट बसवण्याचे बाकी ३० गाळे,