सातारा : गेल्या पाच महिन्यांपासून वेतन अदा न झाल्याने पालिकेत ठेकेदारी तत्त्वावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जवळपास पन्नास महिलांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याने शहरात काही ठिकाणी स्वच्छतेचे काम होऊ शकले नाही.पालिकेच्या आरोग्य विभागात सुमारे दीडशे महिला कर्मचारी या ठेकेदारी पद्धतीने काम करतात. गेल्या पाच महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून त्यांचे वेतन अदा झालेले नाही. वेतनाची संपूर्ण जबाबदारी ठेकेदाराची आहे; परंतु त्यांच्याकडून इतका विलंब का केला जातोय? याबाबत कोणाला कसलीच कल्पना नाही.सध्या कोरोनामुळे उद्योग, व्यवसाय बंद असल्याने अनेकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांचे वेतन न मिळाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार मागणी करूनही वेतन मिळत असल्याने या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष गणेश दुबळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनही केले होते. यावेळी जोपर्यंत वेतन अदा होत नाही तोपर्यंत काम बंद करण्याचा निर्णय महिला कर्मचाऱ्यांनी घेतला होता. त्यानुसार शनिवारी सुमारे ५० महिलांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतला.या आंदोलनामुळे शहरात काही ठिकाणी स्वच्छतेचे काम होऊ शकले नाही. सेवेत कायम असलेल्या आरोग्य विभागातील कर्मचार्यांकडून स्वच्छता करण्यात आली. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी पालिकेची यंत्रणा गेल्या चार महिन्यांपासून अहोरात्र झटत आहे. शहरासह उपनगरांचा भारही पालिकेवर आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे आंदोलन अनेक समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे पालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराशी चर्चा करून हा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.
सातारा पालिका : थकीत वेतनासाठी काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 7:42 PM
गेल्या पाच महिन्यांपासून वेतन अदा न झाल्याने पालिकेत ठेकेदारी तत्त्वावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जवळपास पन्नास महिलांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याने शहरात काही ठिकाणी स्वच्छतेचे काम होऊ शकले नाही.
ठळक मुद्देथकीत वेतनासाठी काम बंद आंदोलनउपाययोजना करण्याचीप्रशासनाकडे मागणी