कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथील वालचंदनगर इंडस्ट्रीज फाउंड्रीज विभागात गुरुवारी आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राष्टवादी महाराष्ट जनरल कामगार युनियन व अॅड. वसंतराव फाळके यांच्या नेतृत्वाखालील राष्टय कामगार संघाच्या कामगारांनी संयुक्तपणे बेमुदत संप सुरू केला.
कामगारांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी कामगार भवनात झालेल्या संयुक्त कामगार मेळावा झाला. अॅड. वसंतराव फाळके यांच्यासह दोन्ही संघटनांच्या कामगार पदाधिकाºयांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार श्ािंदे म्हणाले, ‘वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापनाने कामगारांची पिळवणूक केली आहे. गळचेपीचे धोरण राबविले जात आहे. आजवर सहन केले. मात्र आता कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. कामगारांना वेतनवाढ दिली जात नाही, तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही. कोरेगाव तालुक्यातील एकमेव उद्योग टिकला पाहिजे. या भावनेने आम्ही व्यवस्थापनाला सहकार्य करत आलो आहोत. अनेकदा रास्त मागण्या असूनही कामगारांनी कंपनीचे हित लक्षात घेऊन माघार घेत व्यवस्थापनाला सहकार्य केले. व्यवस्थापनाला याची जाणीव राहिलेली नाही. आता कामगार कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाहीत. त्यामुळे व्यवस्थापनाने कामगारांचा अंत न पाहता मागण्या मान्य कराव्यात.’
अॅड. वसंतराव फाळके म्हणाले, ‘कोरेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील हे कामगार आहेत. त्यांनी काही वर्षांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन करून दाखविले आहे. कंपनी फायद्यात असतानाही व्यवस्थापन चुकीची माहिती प्रसारित करत कामगारांवर अन्याय करत आहे. कामगारांची कुटुंबे जगली पाहिजेत, या हेतूने आजवर आम्ही शांत होतो. आता आमचा अंत पाहू नये, आमची ताकद आम्ही निश्चितपणे दाखवून देऊच.’
दोन्ही कामगार संघटनांच्या प्रतिनिधी व पदाधिकाºयांनी मनोगत व्यक्त केले.प्रथमच दोन्ही कामगार संघटना एकत्रितवालचंदनगर इंडस्ट्रीज कंपनीमध्ये आतापर्यंत दोन कामगार संघटना वेगवेगळ्या मार्गांनी लढा देत होत्या. आता कामगार हितासाठी दोन्ही कामगार संघटनांनी एकत्रित येत व्यवस्थापनाला ताकद दाखवून दिली आहे.