कोपर्डे हवेली : गावात सुरू असणाऱ्या तसेच सुरू करण्यात येणाऱ्या कामांची वरिष्ठ अधिकारी पाहणी करण्यासाठी येणार म्हटलं की ग्रामस्थांतून जय्यत तयारी केली जाते. अशाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पार्ले गावास नुकतीच भेट दिली. जागतिक बँकेचे प्रतिनिधी व शासनाच्या अधिकारी गावात सुरू करण्यात येणाºया चोवीस तास पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी माहिती देण्यासाठी आले असता ग्रामस्थांनी त्यांची बैलगाडीतूनच वाजत गाजत मिरवणूक काढली.
पार्ले, ता. कऱ्हाड येथे चोवीस तास नळपाणी पुरवठ्याच्या जलस्वराज टप्पा क्रमांकदोन या योजनेला जागतिक बँकेच्या माध्यमातून अर्थ पुरवठा करण्यात आला आहे. या बँकेच्या प्रतिनिधी व राज्य शासनाच्या प्रतिनिधींनी नुकतीच गावात येऊन योजनेबाबत ग्रामस्थांना संपूर्ण माहिती दिली.
यावेळी जागतिक बँकेचे प्रतिनिधी सत्यनारायण, जलस्वराजचे व्यवस्थापक दिलीप देशमुख, शिवानी पांडे, सातारा जिल्ह्याचे उपमुख्याधिकारी चंद्र्रशेखर जगताप, महेश भालेराव, सुनील पाटील, सरपंच प्रकाश पाटील, उपसरपंच सुनीता नलवडे, राहुल पाटील, महेश नलवडे, तानाजी नलवडे, ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुकल आदींची उपस्थिती होती.यावेळी सत्यनारायण म्हणाले, ‘गावात सुरू करण्यात येणाºया चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे काम मोठे असून, प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.’यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राहुल पाटील यांनी प्रास्ताविक केले. मोहनराव नलवडे यांनी आभार मानले.ग्रामस्थांनी दिली प्रोजेक्टद्वारे माहिती...पार्ले गावात दोन तास योजनेबद्दल जागतिक बँकेच्या प्रतिनिधी तसेच शासनाच्या अधिकाºयांनी ग्रामस्थांना माहिती दिली. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे ग्रामस्थांनी ढोलताशा अन् रांगोळी काढून स्वागत केले. पाहुण्यांना बैलगाडीत बसवून त्यांना गावातील प्रवेशद्वारापासून हनुमान मंदिरापर्यंत नेण्यात आले. त्या ठिकाणी देवाचे दर्शन घेतल्यानंतर अधिकाºयांनी प्रोजेक्टद्वारे योजनेबाबत ग्रामस्थांना मोहिती दिली.
कऱ्हाड तालुक्यात सहा योजना सुरू : देशमुखदेशात जगातिक बँकेच्या माध्यमातून ५९ जलस्वराजची कामे सुरू आहेत. त्यामध्ये कºहाड तालुक्यात सहा योजना सुरू आहेत. तुमच्या गावची योजना आदर्श ठरावी त्यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. भौगोलिक परिस्थिती पाहिल्यानंतर पार्ले गावाची निवड करण्यात आली असल्याची माहिती जलस्वराजचे व्यवस्थापक दिलीप देशमुख यांनी दिली.