शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
2
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
3
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
4
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
5
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
6
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
7
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
8
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
9
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
10
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर
11
आता इस्रायल-इराण संघर्ष पेटणार...! समोर आला नेतन्‍याहू यांचा 'रिव्हेंज प्लॅन', जाणून अंगावर शहारा उभा राहील
12
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
13
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
14
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
15
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
16
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
17
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
18
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
19
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
20
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट

जग बदल घालूनी घाव...

By admin | Published: December 06, 2015 10:48 PM

महामानवाला अभिवादन : महापरिनिर्वाण दिनानिमित्त साताऱ्यात ठिकठिकाणी घुमले ‘जयभीम’ चे नारे

सातारा : ‘जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव,’ या एकाच वाक्यात ज्यांचे जीवितकार्य संक्षिप्तरूपात सामावले आहे, असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातारा शहरात ‘जयभीम’चे नारे घुमले. विविध कार्यक्रम, उपक्रमांतून महामानवाला अभिवादन करण्यात आले. सायंकाळी आंबेडकरांच्या अनुयायांनी काढलेला ‘कॅन्डल मार्च’ लक्षवेधी ठरला. नगरपालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सकाळपासूनच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसह नागरिकांची गर्दी होऊ लागली होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ धम्मसेवक शंकरराव सोरटे, ‘उपरा’कार लक्ष्मण माने, पार्थ पोळके, कास्ट्राइब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुशीलकुमार कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.दिवसभर शहराच्या विविध भागांतून डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांचे जत्थेच्या जत्थे ‘जयभीम’चे नारे देत पुतळा परिसरात दाखल होत होते. विविध राजकीय पक्ष, संघटना तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत होते. बहुसंख्य अनुयायी पांढरीशूभ्र वस्त्रे परिधान करून आदरांजली वाहण्यास येत होते. विशेष म्हणजे, महिलांची संख्या लक्षणीय होती.पुतळा परिसरात उभारलेले पुस्तकांचे स्टॉल लक्ष वेधून घेत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली, तसेच त्यांच्यावर अभ्यासकांनी लिहिलेली असंख्य पुस्तके स्टॉलवर ठेवण्यात आली होती. दिवसभरात या पुस्तकांची विक्रीही मोठ्या प्रमाणावर झाली. पुतळा परिसरात भावनिक वातावरण होते. सायंकाळी सातच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सदर बझार येथील निवासस्थानापासून भीमाई स्मारकापर्यंत काढलेला ‘कॅन्डल मार्च’ अज्ञानाच्या अंधकारावर ज्ञानाच्या विजयाची ग्वाही देणारा ठरला. ‘बुद्धम सरणम गच्छामी, धम्मं सरणम गच्छामी, संघम सरणम गच्छामी’ या त्रिसरणाचा उच्चार करीत शेकडो स्त्री-पुरुष ‘मार्च’मध्ये सहभागी झाले होते. घराघरातील महिला बाहेर पडून मार्चमध्ये सहभागी झाल्या. (प्रतिनिधी)जब तक सूरज-चॉँद रहेगा...डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात सकाळी त्रिसरण आणि पंचशील ग्रहण करण्यात आले. त्यानंतर बाबासाहेबांच्या शेकडो अनुयायांनी काही क्षण उभे राहून महामानवाला अभिवादन केले. त्यानंतर शेकडो अनुयायांनी जोरदार घोषणा दिल्या. ‘जब तक सूरज-चाँद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.