गॅस सिलिंडरची दरवाढ सातत्याने होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या संसाराचा गाडा अडखळत आहे. गॅस सिलिंडर वाहतूक करणारी गाडी नियमित येत असली, तरी ग्राहकही जपूनच वापर करत आहेत. त्यामुळे मागणीही कमी होत आहे. (छाया : जावेद खान)
०००००००००
धाकधूक वाढली
सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी आता तरी सावध होऊन मास्कशिवाय घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
००००००
विद्यालयात अभिवादन
सातारा : साताऱ्यातील मल्हारपेठेत असलेल्या समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या मतिमंद विद्यालय आणि मूकबधिर विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापिका शोभा गिरमकर यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. ज्ञानेश्वर ढाले यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक बापूसाहेब कांबळे उपस्थित होते.
०००००
रक्तदान शिबिर
सातारा : निवृत्त अभियंता मंडळ, सातारा आणि बी द चेंज युवा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. स्त्रीरोग तज्ज्ञ स्मिता कासा, महेश केंजळे यावेळी उद्घाटक म्हणून उपस्थित होते. बाळासाहेब साळुंखे यांनी प्रास्तविक केले. यावेळी अनिल वाळिंबे, कासार, पांढरपट्टे उपस्थत होते.
००००००
कामाठीपुऱ्यात जयंती
सातारा : कामाठीपुरा येथील श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले ग्रंथालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्ष रमेश वरगंटे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. अरुण चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. करण शिर्के यांनी आभार मानले.
०००००००००
मंदिरासाठी निधी
सातारा : करंजेपेठ येथील महादेव प्रभू प्रतिष्ठानने अयोध्यातील श्रीराम मंदिराच्या उभारणीनिमित्ताने निधीचा धनादेश विश्व हिंदू परिषदेच्या न्यासाकडे सुपूर्द केला. यावेळी अध्यक्ष भाऊसाहेब स्वामी, सागर मलवडे, मोहन साठे, भंडारे उपस्थित होते. बाबूजी नाटेकर यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला.