सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सतत वाढ होत असून बुधवारी नव्या १२ रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा आता ९२ वर पोहोचला आहे. यामध्ये कºहाडमधील १० जणांचा समावेश आहे. तर फलटण तालुक्यातील दोघांनाही बाधा झाला असून यामध्ये एका आरोग्य सेविकेलाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये सतत वाढ होत चालली आहे. आतापर्यंत एका दिवसात २५ रुग्णांची वाढ झाल्याचे समोर आले होते. ही सर्वात मोठी वाढ ठरली होती. त्यानंतर बुधवार, दि. ६ रोजी एकदमच १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. यामध्ये कºहाड तालुक्यातील १० तर फलटणमधील दोघांचा समावेश आहे.
क-हाडच्या वेणूताई चव्हाण आणि फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील प्रत्येकी दोन तसेच कºहाडच्याच कृष्णा मेडिकल कॉलेजमधील आठजणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या १२ मधील ११ रुग्ण हे कोरोना बाधितांच्या निकट सहवासीत आहेत. तर नवीनमध्ये फलटणमधील केअर सेंटरमधील एका आरोग्य सेविकेलाही कोरोना झाल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले आहेत.तिघांना घरी सोडणार; ११६ जण निगेटीव्ह...जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. यामधील तिघांचा १४ दिवसांनंतरचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. तसेच दाखलपैकी ११६ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयातील ४८ आणि कृष्णा मेडिकल कॉलजमधील ६८ जणांचा समावेश आहे.त्यांचा मृत्यू सारीने नाही; अहवाल प्राप्त...दि. ४ एप्रिल रोजी दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात श्वसनाच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे दोघांचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू सारीसदृ्श आजाराने झाल्याचा अंदाज होता. मात्र, त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. यावरुन त्यांचा मृत्यू हा सारीने झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.