कऱ्हाड : हस्तरेषा पाहून नशीब घडत नाही, तर तळहाताच्या पाठीमागे असणारे मनगट, मन आणि मेंदू यांच्या ताकदीवर नशीब घडविता येते. महाराष्ट्राचा चेहरामोहरा व मातीची कूस बदलण्याचे काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. महाराष्ट्राचा विसाव्या शतकाचा इतिहास लिहिताना कर्मवीरांना डोळ्यासमोर ठेवूनच लिहावा लागेल. त्यांनी ज्ञानाची गंगा शेतकऱ्यांच्या झोपडीपर्यंत नेण्याचे महान कार्य केले आहे. म्हणून हा समारंभ नसून या महामानवाने जे कष्ट उपासले, त्या कष्टकरी रयतेच्या राजाचा हा सन्मान आहे. शाहंूचा व महात्मा फुले यांचा वसा आणि वारसा चालविण्याचे काम कर्मवीरांनी केले. यातच त्यांचे मोठेपण सामावले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांनी केले.येथील रयत शिक्षण संस्थेच्या गाडगे महाराज महाविद्यालयात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती व नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील अध्यक्षस्थानी होते. अॅड. रवींद्र पवार, रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. गणेश ठाकूर, माधव मोहिते, पंचायत समिती उपासभापती विठ्ठलराव जाधव, अॅड. सदानंद चिंगळे, जितेंद्र डुबल, अतुल कदम, फत्तेसिंह जाधव, लालासाहेब पाटील, प्राचार्य डॉ. एस. टी. साळुंखे, प्राचार्य प्रतिभा गायकवाडी आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. पतंगराव कदम म्हणाले, ‘रयत शिक्षण संस्थेने व कर्मवीर अण्णांनी गरजेप्रमाणे शिक्षणाची सुधारणा केली. जिद्दीने व ताकदीने सर्व कार्य पूर्ण करण्याचे बळ दिले. माणूस हा परिवर्तनाचा केंद्रबिंदू मानून माणूस घडविण्याचे काम कर्मवीर अण्णांनी केले. त्यांनी एक नवा रस्ता निर्माण केला. जून २०१६ पासून महाविद्यालयाचा पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल सुरू करण्याचा मानस आहे.’ प्रेक्षागृहाला प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा डॉ. कदम यांनी यावेळी केली. (प्रतिनिधी)नवीन अर्धपुतळ्यांचे अनावरणएक लाख चाळीस हजार स्क्वेअर फूट बांधकाम केलेल्या व सुमारे दहा कोटी खर्च झालेल्या १११ खोल्यांच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व ८२ खोल्यांच्या दोन कोटी ६२ लाख खर्चाच्या नूतन मुलांच्या वसहतिगृहाचे उद्घाटन व कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगे महाराज व दानशूर बंडो गोपाळा मुकादम यांच्या नवीन अर्धपुतळ्यांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले.
इतिहास लिहिताना क र्मवीरांना डोळ्यासमोर ठेवावे
By admin | Published: September 22, 2015 9:53 PM