सातारा : पावसाला सुरुवात झाली नाही तोच दरड कोसळण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. सातारा-कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटात काही महिन्यांपूर्वीच सिमेंटचे संरक्षक कठडे उभारण्यात आले. परंतु घाटरस्ता खचत असल्याने कठड्यांचाच कडेलोट झाला. त्यामुळे यवतेश्वर घाटातून जाताय.. तर सावधान असं म्हणण्याची वेळ आली आहे.पावसाला सुरुवात झाली की यवतेश्वर घाट ढगात हरवून जातो. चिंब भिजत निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तरुण-तरुणींची पावले या घाटाकडे वळायला लागतात. जागतिक वारसास्थळाच्या यादीत कास पुष्प पठाराचा समावेश झाल्यानंतर दरवर्षी लाखो पर्यटक पुष्पपठाराला भेट देतात. त्यामुळे सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटात वाहतुकीचा मोठा ताण असतो.साताऱ्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या यवतेश्वर घाटात सिमेंटपासून संरक्षक कठडे उभारण्यात आले आहेत. सर्वसाधारणपणे दोन फूट रुंद आणि पाच फूट लांबीच्या कठड्यांमुळे वाहतूक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा होती. परंतु घाटरस्ता खचल्याने तेथील संपूर्ण कठडा दरीत कोसळला आहे. याच घाटात रविवारी झालेल्या पावसामुळे दरड कोसळली होती. त्यातच जमीन खचण्याचे प्रकारही समोर येत असल्याने या रस्त्याची पाहणी करून धोकादायक ठिकाणी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.गतवर्षी बांधकाम विभागाकडून घाटातील नादुरुस्त कठड्यांची कामे मोठ्या स्वरुपात करण्यात आली; परंतु अजूनही बहुतांशी ठिकाणची परिस्थिती जैसे थेच आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या दुतर्फा रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक बसविणे गरजेचे बनले आहे. बांधकाम विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.सुरक्षेसाठी लावले रस्त्याकडेला पिंपयवतेश्वर घाटात ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे, त्या ठिकाणी धोका दर्शविण्यासाठी चक्क पिंंप लावण्यात आले आहेत. घाटातून साताऱ्याकडे येताना तीव्र उतार आहे. त्यामुळे अनेक वाहनधारक गाडी बंद करून वेगाने साताऱ्याकडे येतात. बंद स्थितीतील सुसाट वाहनचालकांना हा धोका लक्षात येत नाही, त्यामुळे मोठा अनर्थ घडू शकतो.घाटामध्येच फोटोसेशनएका बाजूने रस्त्यालगत कोसळणारी दरड तर दुसरीकडे नादुरुस्त व तुटलेले संरक्षक कठडे यामुळे एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे अकस्मात दरडी कोसळण्याची शक्यता अधिक असताना अनेक वाहनधारक आपली वाहने घाटात थांबवून फोटोसेशन करताना दिसून येत आहेत.
यवतेश्वर घाट : रस्ता खचला; कठड्यांचा कडेलोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:18 PM
पावसाला सुरुवात झाली नाही तोच दरड कोसळण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. सातारा-कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटात काही महिन्यांपूर्वीच सिमेंटचे संरक्षक कठडे उभारण्यात आले. परंतु घाटरस्ता खचत असल्याने कठड्यांचाच कडेलोट झाला. त्यामुळे यवतेश्वर घाटातून जाताय.. तर सावधान असं म्हणण्याची वेळ आली आहे.
ठळक मुद्देयवतेश्वर घाट : रस्ता खचला; कठड्यांचा कडेलोटकाही दिवसांपूर्वीच बनविलेले संरक्षक कठडे ढासळले; वाहतुकीला धोका