शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

वर्षात २३ हजार चारचाकी वाहने रस्त्यावर

By admin | Published: May 14, 2017 1:04 AM

कऱ्हाड, पाटणला संख्या वाढली : तीन वर्षांत ६३ हजार १७९ नव्या वाहनांची नोंद; एकूण संख्या पावणेदोन लाखाच्या घरात

लोकमत न्यूज नेटवर्क --कऱ्हाड : दारात दुचाकी असणं आता साधारण झालंय. प्रत्येक घरात सध्या दुचाकी असतेच; पण गत तीन वर्षांत कऱ्हाडसह पाटण तालुक्यामध्ये चारचाकीची संख्याही झपाट्याने वाढली आहे. कऱ्हाडला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय झाल्यापासून रस्त्यावर येणाऱ्या नवीन वाहनांची संख्या वाढत असून, चार वर्षांत वाहने दुपटीने वाढल्याचे दिसून येते. वर्षाला सरासरी २३ हजार नवीन वाहने रस्त्यावर येतायत, हे विशेष.कऱ्हाडला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय झाल्यामुळे चार वर्षांत येथे झालेली वाहनांची नोंदणी पाहता ही धक्कादायक बाब समोर आली आहे. दारात दुचाकी असणं हे १९९० च्या दशकात श्रीमंतीचं लक्षणं मानलं जात होतं. त्यावेळी प्रत्येक गावात हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच दुचाकींची संख्या असायची. परगावची एखादी चारचाकी गावातील रस्त्यावरून फिरली तरी त्यावेळी तो चर्चेचा विषय असायचा; पण कालांतराने ही चित्र बदललं. सायकल इतिहासजमा तर दुचाकी सर्वसाधारण झाली. चारचाकीला महत्त्व आलं. सध्या प्रत्येक दोन घरांपाठीमागे एका घरात चारचाकी वाहन उपलब्ध झालंय. कऱ्हाड व पाटण तालुक्यांत काही वर्षांपूर्वी वाहनांची संख्या मर्यादित होती. इतर वाहनांपेक्षा वाहन खरेदी करताना बहुतांशजण ट्रॅक्टरला पसंती द्यायचे. क्वचित एखाद्याच मोठ्या बागायतदाराकडे जीप अथवा जास्तीत जास्त अ‍ॅम्बेसिडर असायची; पण सध्या जमाना एवढा बदललाय की, दारात कार असणंही आता सामान्य झालंय. कारची किंमत आणि ब्रँडच्या तराजूत श्रीमंती तोलली जातेय. त्यामुळे मध्यमवर्गीय किंवा सामान्य कुटुंबात कार असणं यात नावीन्यच राहिलेलं नाही, अशी परिस्थिती आहे.कऱ्हाड व पाटण तालुक्यांत जानेवारी २०१३ ते जानेवारी २०१४ या एका वर्षामध्ये एकूण २६ हजार ७९२ एवढ्या वाहनांची भर पडली. त्यानंतर प्रत्येक वर्षी वाहनांची संख्या वाढतच असल्याचे दिसते. सध्या वाहनांची संख्या पावणेदोन लाखापर्यंत फुगली आहे. पण ज्या प्रमाणात वाहने वाढतायंत त्या प्रमाणात रस्ते उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. तासगाव, चांदोली, पाटण, शामगाव तर पाटण तालुक्यातून चिपळूण, कोयना ते नवजा हे राज्यमार्ग जातात. या राज्यमार्गांमुळे अनेक गावे एकमेकांना जोडली गेली आहेत. तसेच स्थानिक पातळीवर अनेक ग्रामसडक व हमरस्ते आहेत. सध्या कऱ्हाड-पाटण, कऱ्हाड-तासगाव, कऱ्हाड-ढेबेवाडी या रस्त्यांचे चौपदरीकरण झाले आहे. या रस्त्यावर वाहने सुसाट धावतायत; पण राज्यमार्ग वगळता इतर रस्त्यांचे रुंदीकरण झालेले नाही. वर्षानुवर्षापासून रस्ते आहे त्याचस्थितीत आहेत. वाहनांची संख्या व रस्त्यांची स्थिती पाहता मोठा असमतोल असल्याचे जाणवते.दुचाकीपाठोपाठ कारचीही चलतीकऱ्हाड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जानेवारी २०१३ ते जानेवारी २०१४ या एका वर्षाच्या कालावधीत तब्बल २६ हजार ७९२ नवीन वाहनांची नोंदणी झाली होती. त्यामध्ये दुचाकींची संख्या सर्वाधिक म्हणजेच २३ हजार ४४, कार २ हजार १७८, टॅक्सी प्रवासी वाहने ९५, माल वाहतूक ट्रक ४३४, ट्रॅक्टर ८७९, ट्रेलर ३५७, मालवाहतूक रिक्षा १०३ आदी वाहनांचा समावेश होता. परिवहन कार्यालयात रोज नवीन वाहनांची नोंद होते. २०१४ नंतर २०१७ अखेर तब्बल ६३ हजार १७९ एवढ्या वाहनांची वाढ झाली आहे.वर्षात किमान २५ हजार वाहनांची वाढकऱ्हाडला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होण्यापूर्वी कऱ्हाडसह पाटण तालुक्यात दुचाकी ४१ हजार ८०, कार ५ हजार ९२३, प्रवासी वाहने १ हजार ४१३, रिक्षा १ हजार ५९३, ट्रॅव्हल्स ४८, ट्रक ३ हजार ३३०, टेम्पो ३४९, मालरिक्षा ९३८, रुग्णवाहिका १३६, स्कूल बस ७७, खासगी सेवा १२, ट्रॅक्टर ४ हजार २१७, ट्रेलर ४ हजार ६७०, इतर वाहने २२५ अशी एकूण ६७ हजार ४११ एवढी वाहने होती. त्यानंतर त्यामध्ये वर्षभरात वाढ होऊन वाहनांची संख्या ९४ हजार २०३ वर पोहोचली. म्हणजेच एका वर्षात कऱ्हाडसह पाटण तालुक्यात २६ हजार ७९२ एवढ्या वाहनांची वाढ झाली.चौदा प्रकारांत वाहनांची नोंदणीपरिवहन कार्यालयात वाहनांची नोंदणी चौदा प्रकारांमध्ये करण्यात येते. दुचाकी, कार, प्रवासी वाहने, रिक्षा, ट्रॅव्हल्स, ट्रक, मालट्रक, टेम्पो, मालरिक्षा, रुग्णवाहिका, स्कूल बस, खासगी सेवा, ट्रॅक्टर, ट्रेलर, इतर वाहने या वर्गवारीत ही नोंदणी होते. शोरूमची संख्याही वाढलीकऱ्हाडला २०१४ पर्यंत ठराविक वाहनांची हातावर बोटावर मोजण्याइतपत शोरूम होती. मात्र, परिवहन कार्यालय झाल्यानंतर येथे शोरूमची संख्याही झपाट्याने वाढल्याचे दिसते. सध्या दुचाकी, कार, एक्सयुव्ही, ट्रक, ट्रॅक्टर, रिक्षाची वेगवेगळ्या कंपन्यांची शोरूम कऱ्हाडमध्ये पाहावयास मिळतात. ही सर्व शोरूम पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत नांदलापूर ते गोटे गावच्या हद्दीपर्यंत आहेत.चौदा प्रकारांत वाहनांची नोंदणीपरिवहन कार्यालयात वाहनांची नोंदणी चौदा प्रकारांमध्ये करण्यात येते. दुचाकी, कार, प्रवासी वाहने, रिक्षा, ट्रॅव्हल्स, ट्रक, मालट्रक, टेम्पो, मालरिक्षा, रुग्णवाहिका, स्कूल बस, खासगी सेवा, ट्रॅक्टर, ट्रेलर, इतर वाहने या वर्गवारीत ही नोंदणी होते.