शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

वय वर्षे नऊ अन् सुवर्ण पदके वीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 10:42 PM

जगदीश कोष्टी । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : खाणं, खेळणं, मनसोक्त कार्टून पाहणं अन् वेळ मिळालाच तर अभ्यास करणं. ...

जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : खाणं, खेळणं, मनसोक्त कार्टून पाहणं अन् वेळ मिळालाच तर अभ्यास करणं. हा दिनक्रम सरासरी नऊ वर्षीय मुला-मुलींचा असतो. यामुळे पालक चिंतेत दिसतात; पण साताऱ्यातील कनिष्का माने या चिमुरडीनं कमालच केलीय. तिने राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत यंदा हॅटट्रीक केली. तिने वीस सुवर्ण, दोन ब्राँझ, दोन रजत पदकांची कमाई केली.कनिष्काचे वडील चंद्रकांत माने हे साताºयात कपडे शिलाईचे काम करतात. ते मूळचे डबेवाडी येथील असून, व्यवसायाच्या निमित्ताने साताºयात स्थायिक झाले. मंगळवार तळे परिसरात राहत असताना माने दाम्पत्य कनिष्काला घेऊन दररोज सकाळी शिवाजी उदय मंडळाकडे फिरायला जात. तेथे खेळणारी मुलं पाहून कनिष्कानेही खेळात नाव कमवावे.कनिष्काला वयाच्या सहाव्या वर्षी मैदानावर घेऊन जाऊ लागले. तिचा कल पाहून कनिष्काला आर्चरीत घालण्याचा निर्णय घेतला. कामामुळे वडील तिला मैदानावर घेऊन जाऊ शकत नाही. ही जबाबदारी आईने उचलली. दररोज सकाळी सात ते साडेअकरा आणि सायंकाळी सहा ते आठ या वेळेत ती सराव करते. तिला न चुकता आई ने-आण करते.कनिष्काला सुरुवातीला लाकडी धनुष्यबाण घ्यायचा होता. लाकडी बोची किंमत नऊ हजार रुपये होती. हा खर्च झेपणारा नव्हता. तेव्हा आईने मंगळसूत्र गहाण ठेवून बो आणला. लाकडी बोवर खेळत असली तरी राष्ट्रीय स्पर्धेसाठी रिकव्ह बोची आवश्यकता असते. त्याची किंमत सरासरी दीड लाखाच्या घरात आहे. तिचा राष्ट्रीयस्तरावरील खेळ पाहून राष्ट्रीय पंच रणजित तामले यांनी स्वत:कडील रिकव्ह बो दिला आहे.प्रशिक्षक शिवशंकर चोरट, राष्ट्रीय प्रशिक्षक रणजित चामले, गुरुवर्य बबनराव उथळे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्काने पदके मिळविली आहेत.शांत स्वभावाचा फायदाकनिष्काचा स्वभाव लहानपणापासून अबोल. ती सतत शांत असायची, कोणाशी फार बोलायची नाही. तिच्या याच स्वभावाचा फायदा कनिष्काला आर्चरी खेळताना होतो. आसपास कितीही गोंधळ असला तरी लक्ष्यापासून तिची नजर हटत नाही. त्यामुळे तिला स्पर्धेत सहज यश मिळते.