भरतगाववाडी येथील श्री गजानन भंडारा हा गावचा एक प्रमुख उत्सव आहे. गेल्या वर्षापासून संपूर्ण देशावर आलेल्या कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घातलेल्या निर्बंधामुळे यंदाचा होणारा श्री गजानन भंडारा रथोत्सव रद्द करण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ भरतगाववाडी यांचेकडून देण्यात आली आहे. दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेला ‘एक गाव, एक गणपती’ या उक्तीने या गणपतीची मोठ्या प्रमाणावर रथातून भव्य मिरवणूक काढून गणेशाचे विसर्जन करून आलेल्या सर्व भाविक भक्तांना पुरणपोळीचा महाप्रसाद दिला जातो, परंतु संपूर्ण जिल्ह्यात कोरोना महामारीची दुसरी लाट अजूनही ओसरली नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाने घातलेले कडक निर्बंध अजूनही जैसे थे आहेत. त्यामुळे यंदाचा भंडारा उत्सवही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
भरतगाववाडीचा यंदाचा श्री गजानन भंडारा रथोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:39 AM