बनपेठ-येराड येथील येडोबा यात्रा नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे, देवस्थान समिती अध्यक्ष सदानंद साळुंखे, सरपंच आबासाहेब साळुंखे, प्रकाश साळुंखे, उपसरपंच नीलेश साळुंखे, यशवंत जाधव, राजेंद्र पुजारी, पोलीस पाटील रवींद्र साळुंखे, तलाठी पी. जी. शिंदे, प्रकाश साळुंखे, भरत पुजारी, विठ्ठल पुजारी, बळिराम साळुंखे, पंढरीनाथ साळुंखे, अनिल साळुंखे, हणमंत साळुंखे, सीताराम साळुंखे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकाचे श्रद्धास्थान असलेल्या येडोबा देवाची यात्रा २७ एप्रिलपासून पाच दिवस भरणार होती. या यात्रेला दरवर्षी लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. गतवर्षीप्रमाणे चालूवर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात्रा रद्द करण्याचा आदेश दिला आहे. यात्रा काळात मंदिर व परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यात्रेपूर्वी येराड व बनपेठ गावाचे शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी विशेष कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येईल, असे तहसीलदार टोम्पे यांनी सांगीतले.
स्थानिक पदाधिकारी, मानकरी, पुजारी यांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. यात्रा कालावधीत मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून मंदिराकडे येण्याचे सर्व मार्ग बॅरिकेटस् लावून बंद केले जाणार आहेत. मंदिर परिसरात स्वयंसेवकांशिवाय इतर कोणी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक चौखंडे यांनी दिला. प्रास्ताविक पी. पी. साळुंखे यांनी केले. नीलेश साळुंखे यांनी आभार मानले.