...................
आरटीई प्रवेश परीक्षा उद्यापासून
सातारा : शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दि. ३ ते २१ मार्च अखेर राबविण्यात येणार असून या कालावधीत पालकांनी आपल्या पाल्याचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन प्राथमिकचे शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी केले आहे. पालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकांतील मुला-मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.
..................
वाखरी परिसरात गहू काढणीस वेग
फलटण : फलटण तालुक्यातील ढवळ,वाखरी व तालुक्याच्या कॅनॉल पट्ट्यात गव्हाच्या काढणीस वेग आला आहे. यंत्राच्या सहाय्याने काढणीचा धूमधडाका सुरू असून यंदा रब्बी हंगामातील अन्य पिकांपेक्षा फलटण तालुक्यात गव्हाचे पीक विक्रमी उत्पादनाने निघत आहे. यंदा गव्हाच्या पिकाच्या पोषणासाठी वातावरण चांगले होते.
........................