सातारा : नियमित योगाभ्यासामुळे औषधेही कमी होऊ शकतात आणि आपण तणावमुक्त राहून अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो. तसेच व्यायाम आणि योगासने यातला फरक त्यांनी अतिशय विनोदी ढंगात सांगितला. तसेच संस्थेच्या कार्याचा गौरवही केला.योगविद्याधाम सातारा शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या योगसंमेलनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करून झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात जिल्हा सरकारी वकील विधिज्ञ विकास पाटील-शिरगावकर, कालिदास योग महाविद्यालय नाशिकच्या प्राचार्या डॉ. आशाताई वेरुळकर, संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, उपाध्यक्षा शैलजा ठोके व कोल्हापूर विभागप्रमुख विजय शेटे उपस्थित होते.प्रमुख पाहुणे अॅड. विकास पाटील-शिरगावकर यांनीही तणावमुक्त जीवनासाठी योगाची अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन केले. संस्थेच्या सचिव मृणाल कुलकर्णी यांनी शाखा परिचय करून दिला. या परिसंवादात डॉ. अजित कुलकर्णी, डॉ. राजश्री देशपांडे, डॉ. कल्पना जाधव, विजय शेटे व डॉ. राजश्री चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रल्हाद पार्टे, सचिन पुराणिक, घन:श्याम सेठ, सुजाता पाटील, धनश्री पाटील, राजसी हलगेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सविता कारंजकर यांनी सूत्रसंचालन केले. श्वेता कोल्हापुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. (प्रतिनिधी)
योग संमेलन साधकांसाठी प्रेरणादायी : जी. श्रीकांत
By admin | Published: February 11, 2015 9:22 PM