तत्कालीन केंद्रीय मंत्री आनंदराव चव्हाण, तत्कालीन खासदार प्रेमिलाकाकी चव्हाण, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, बी. एन. काका ऊर्फ काकासाहेब चव्हाण, माजी सभापती संजय देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव पाटील, बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. दिलीपराव चव्हाण, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आशिष आचरे... असे एक से बढकर एक नेतृत्व या गावाने गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकीय क्षेत्राला दिले. मात्र यामध्ये राजे संघर्ष प्रतिष्ठानचे योगेश पाटणकर यांच्यारूपाने आता एका नव्या राजकीय नेतृत्वाचा उदय झाला.
स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीच्या प्रमुखांविरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव उंडाळकर यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन योगेश पाटणकर यांनी केलेली खेळी यशस्वी ठरली. या ग्रामपंचायतीमध्ये तेरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत दहा जागांवर काँग्रेसला यश आले, तर केवळ तीनच जागांवर विरोधकांना विजय मिळाला. तालुक्यात झालेल्या ११९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत एकमेव कुंभारगावातच काँग्रेसला यश मिळाले, हेही स्पष्ट होते.
- चौकट
कुंभारगावच्या मतदारांनी माझ्यासह आमच्या उमेदवारांवर खूप मोठा विश्वास दाखवला आहे. त्यांच्या विश्वासास पात्र राहून गावाचा विकास आणि जनतेची सेवा हेच सूत्र कायम राहील. अडवाअडवीचे राजकारण न करता पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने गावाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील राहू.
- योगेश पाटणकर
फोटो : २०केआरडी०६
कॅप्शन :
कुंभारगाव, ता. पाटण ग्रामपंचायतीत सत्तांतर घडविल्यानंतर योगेश पाटणकर यांच्यासह समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.