शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

तुमची ५६ इंचांची छाती आहे, मग ‘कुलभूषण’ला का सोडविले नाही? शरद पवार यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 1:38 AM

सत्तेचा गैरवापर, लोकांची फसवणूक, शेतकऱ्यांची फसवणूक, तरुणांना बेकार कसे करावे, याचा उत्तम नमुना म्हणून या मोदी सरकारकडे पाहिले पाहिजे. सीमेवर जवान प्राणांची आहुती देत आहेत.

क-हाड (जि. सातारा) : सत्तेचा गैरवापर, लोकांची फसवणूक, शेतकऱ्यांची फसवणूक, तरुणांना बेकार कसे करावे, याचा उत्तम नमुना म्हणून या मोदी सरकारकडे पाहिले पाहिजे. सीमेवर जवान प्राणांची आहुती देत आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर त्याचा बदला आमच्या जवानांनी घेतला. पण पंतप्रधान मोदी त्याचा राजकीय लाभ उचलत आहेत. विंग कमांडर अभिनंदनला जागतिक पातळीवरील एका करारानुसार पाकिस्तानने सोडले. तुमची ५६ इंचांची छाती आहे, तर मग कुलभूषण जाधवला का सोडविले नाही?, असा सवाल राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.क-हाड येथे रविवारी आघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, दलित संघटनेचे जोगेंद्र कवाडे, प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, आमदार हसन मुश्रीफ, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.पवार म्हणाले, गत दोन वर्षांत राज्यात १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र, त्याचे सोयररसुतक मोदी सरकारला नाही. तर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गत लोकसभा निवडणुकीत विरोधकांची एकजूट नव्हती, त्यामुळे मत विभागणी झाली आणि मोदींनी दिलेल्या ढीगभर आश्वासनांना जनता भूलली. मात्र, आज विरोधक एकवटले आहेत. त्यामुळे अशावेळी त्यांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न भंगणार आहे.भाजपाचे बाळ सेनेच्या ओट्यातशिवाजी महाराजांच्या नावावर आजवर ज्यांनी आपले राजकारण केले. तीच शिवसेना आज छत्रपतींच्या वंशजाचा पराभवाचे स्वप्न पाहत आहे. त्यासाठी नुकतेच भाजपने आपले बाळ सेनेच्या ओट्यात घातले आहे; पण अशी भाड्याची माणसे आणून राजेंचा पराभव करणं शक्य नाही, असे जयंत पाटील म्हणाले.रामराजेंचा मला नेहमीच पाठिंबा - उदयनराजे‘एकबार मैने कमिटमेंट कर दी, तो मैं खुदकी भी नही सुनता’ असा डायलॉग म्हणत उदयनराजे भोसलेंनी कॉलर उडवली. त्याला व्यासपीठावरील मान्यवर आणि समोरच्या गर्दीने दाद दिली. तर रामराजे नाईक-निंबाळकर हे तर माझे कॉलेज जीवनापासूनचे मार्गदर्शक आहेत. त्यांचा मला नेहमीच पाठिंबा असतो, असे उदयनराजेंनी सांगताच टाळ्यांच्या कडकडाटात त्याला प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक