आॅनलाईन लोकमतफलटण , दि. १२ : दिवसेंदिवस वाचनाची आवड कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करतानाच समाजातील महान व्यक्तिमत्त्वांच्या चरित्राचे वाचन व अभ्यास होणे ही काळाची गरज आहे. इतिहास वाचल्याशिवाय इतिहास घडविता येणार नाही. तरुणांनी होळकर घराण्याचा इतिहास वाचावा. प्रामुख्याने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा आदर्श तरुणांनी होळकर यांच्या विचारांचा आदर्श तरुणांनी घ्यावा, असे आवाहन विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती व नेहरू युवा मंडळ, दुधेबावी यांच्यावतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९२ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रमेश लबडे, धनंजय साळुंखे-पाटील, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, म्हसवडचे नगराध्यक्ष तुषार वीरकर, जिल्हा परिषदेच्या सदस्या भावना सोनवलकर, अंकुशराव भांड, मुकुंदराव जिल्हा उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, सरपंच ज्योती मोरे, प्रा. भीमदेव बरुंगले आदी उपस्थित होते.रामराजे म्हणाले, ह्यतरुणांनी स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासनात दाखल होण्याची आणि प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारीपदाद्वारे समाजाच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याची आवश्कता आहे. त्यासाठी तरुणांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाद्वारे स्पर्धा परीक्षेतील यश खेचून आणावे.यावेळी धनंजय साळुंखे- पाटील, माणिकराव सोनवलकर, रमेश लबडे अरविंद मेहता आदींची भाषणे झाली. स्वाती कडू-देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. अमोल चांगण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब एकळ यांनी आभार मानले.
अहिल्यादेवींच्या विचारांचा आदर्श तरुणांनी घ्यावा : रामराजे
By admin | Published: June 19, 2017 3:35 PM