शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

तीनशे फूट वजीर सुळक्यावर तरुणाने फडकविला तिरंगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 11:40 PM

डोंगरावरील खडतर आव्हाने पेलत हे गिर्यारोहक दोन तासांनंतर सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचले. यानंतर सुळका सर करण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोर उभे ठाकले. मात्र, रोहित व त्याच्या सहकारी गिर्यारोहकांनी ‘वजीर’ सर करण्याचा चंग बांधला होता. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी रोपच्या साह्याने हा सुळका अखेर सर केला अन् सुळक्यावर तिरंगाही फडकविला.

ठळक मुद्देठाणे जिल्ह्यातील माहुली किल्ल्याच्या पायथ्यापासून सुरुवातसाहसाचे कौतुक, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मोहीम

सचिन काकडे ।

सातारा : गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा, पाहता क्षणी काळजात धडकी भरवणारा सह्याद्रीचा कडा म्हणजे ठाणे जिल्ह्यातील वजीर सुळका. बुद्धिबळाच्या पटावरील वजिराप्रमाणे ३०० फूट सरळ उंच असणारा हा सुळका कोरेगाव तालुक्यातील कुमठे गावचा साहसवीर रोहित जाधव व त्याच्या सहकाऱ्यांनी सर केला आणि तिरंगा फडकविला. निमित्त होतं.. ७१ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचं!

कुमठे येथे राहणाºया रोहित जाधव या तरुणाने किल्ले भ्रमंतीची आवड जोपासली आहे. आतापर्यंत त्याने राजगड, तोरणा, शिवनेरी, सिंहगड असे अनेक किल्ले सर केले आहेत. गड-किल्ले सर करत असतानाच आपण गिर्यारोहण करावं, अशी प्रबळ इच्छा रोहितच्या मनात आली. गिर्यारोहणाचं कोणतंही प्रशिक्षण नसताना केवळ इच्छाशक्तीच्या बळावर त्याने सर्वप्रथम रायगड जिल्ह्यातील लिंगाणा सुळका सर केला. यानंतर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘वजीर’ही सर केला.ठाणे जिल्ह्यातील माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी वजीर सुळका आहे. ९० अंशातील ३०० फूट उंच भला मोठा हा सुळका चढाईसाठी अत्यंत अवघड मानला जातो. अंगाला दरदरून घाम फोडणारा हा सुळका सर करण्याचे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. रोहित व त्याच्या सहकाऱ्यांनी कदबाव या गावापासून मोहिमेला सकाळी सहा वाजता सुरुवात केली.

डोंगरावरील खडतर आव्हाने पेलत हे गिर्यारोहक दोन तासांनंतर सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचले. यानंतर सुळका सर करण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोर उभे ठाकले. मात्र, रोहित व त्याच्या सहकारी गिर्यारोहकांनी ‘वजीर’ सर करण्याचा चंग बांधला होता. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी रोपच्या साह्याने हा सुळका अखेर सर केला अन् सुळक्यावर तिरंगाही फडकविला.

या मोहिमेत स्वानंदी तुपे, सचिन तुपे, करिश्मा राणा, प्रियांका चव्हाण, स्नेहा सुरवसे, डॉ. मनीषा सोनावणे, आरती शिंदे यांनीही सहभाग घेतला. त्यांना अनिल वाघ, महेश पवार, संदीप आजबे, गिरीष डेंगाने व शिवसह्याद्री ट्रेकिंग गुु्रपचे मार्गदर्शन लाभले.

 

  • ‘बेटी बचाओ... बेटी पढाओ’चा दिला नारा

वजीर सुळका सर करताच रोहित जाधव व त्याच्या सहकारी गिर्यारोहकांनी भारताचा राष्ट्रध्वज हातात घेऊन विजयाचा आनंद साजरा केला. तसेच राष्ट्रप्रेम चेतवणारे राष्ट्रगीतही म्हटले. यावेळी ‘बेटी बचाओ.. बेटी पढाओ’ असा नारा देत नारी शक्तीचा जागर ही करण्यात आला.

 

वडिलांमुळे माझ्यात गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. मी आजवर महाराष्ट्रातील अनेक गड-कोट अन् सुळके सर केले आहेत. जगातील सर्वात मोठी सात शिखरं मला सर करावयाची आहेत.- स्वानंदी तुपे, (कुंजीरवाडी, हरपडसर)

 

गिर्यारोहणाचं कोणतंही प्रशिक्षण नसताना मी लिंगाणा आणि त्यानंतर वजीर सुळका यशस्वी सर केला. हा सुळका सर करणं म्हणजे एखादं स्वप्न पूर्ण झाल्यासारखंच आहे. आजवरचा हा माझा अविस्मरणीय अनुभव असून, आता मी गिर्यारोहणाचं प्रशिक्षणही घेणार आहे. - रोहित जाधव, कुमठे (कोरेगाव)

टॅग्स :Satara areaसातारा परिसरthaneठाणे