सातारा : आंतरराष्ट्रीय बाजारात लाखोची किंमत असलेल्या दुर्मीळ इंडीयन स्वॉफ्ट शेल जातीच्या कासव विक्रीसाठी आलेल्या एकाला स्थानिक शाखेने अटक केली. या गुन्ह्यामध्ये एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
मंजूष शिवाजी जगताप (वय १९, सध्या रा. रामनगर, सातारा. मूळ रा. जगतापगल्ली, शहापूर, उस्मानाबाद)असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शाहुपूरी चौकात गुरुवारी दुपारी दोन युवक संशयितरित्या फिरत असल्याचे तसेच त्यांच्या पिशवीमध्ये काही वस्तू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक निरीक्षक डॉ. सागर वाघ यांना या माहितीची खात्री करण्यास सांगितले. त्यांच्या पथकाने शाहुपूरी चौकात सापळा रचून मंजूष जगतापसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीमध्ये इंडीयन सॉफ्ट शेल जातीचे कासव आढळून आले.
हे कासव त्यांनी विक्रीसाठी आणले असल्याचे पोलिसांना सांगितले. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, ज्योतीराम बर्गे, हवालदार उत्तम दबडे, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, प्रवीण कडव, केतन शिंदे यांनी भाग घेतला.