पाचगणी : सनपाने (ता. जावळी) येथील प्रवीण आनंदराव पिसाळ (वय ३०) याला धावत्या दुचाकीवर हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
सनपाने येथील प्रवीण आनंदराव पिसाळ यास रविवारी सकाळी त्रास होऊ लागल्याने तो सव्वादहाच्या दरम्यान एकटाच दुचाकी (एमएच ०४ बीव्ही ६८३२) वरून डॉक्टरकडे उपचारार्थ निघाला होता. यावेळी रस्त्यात आंबेघर फाट्याच्या पुढे गाडीवरच चक्कर आल्याने बाईक रस्त्याकडेच्या बांधाला धडकली. प्रवीण खाली पडला. त्यास लागलीच उपचारार्थ सोमर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
परंतु उपचाराआधीच प्रवीणची प्राणज्योत मालवली. या घटनेने पिसाळ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.
आयकार्ड फोटो
२२प्रवीण पिसाळ