शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भाविक चिमुरड्यासह युवक ठार

By admin | Published: September 11, 2016 11:54 PM

पोलिसांत नोंद : पाचगणी-महाबळेश्वर मार्गावरील विविध घटना

पाचगणी : महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर विविध अपघांतात एका चिमुरड्यासह युवक ठार झाला आहे. टेम्पोने दिलेल्या धडकेत पुणे जिल्ह्यातील भाविकांमधील एका साडेचार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत भिलारमधील युवक कारच्या अपघातात ठार झाला आहे. याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, शंकर रामभाऊ चव्हाण (वय ६२, रा. वडज, ता. जुन्नर, जि. पुणे) हे पत्नी सुमित्रा, मुलगा अमोल, सून सुरेखा, नातू प्रयाग, नात स्वरा असे सहाजण वडज येथीलच रूपाली नीलेश दिवेकर यांच्या ट्रॅव्हल्स (एमएच ०४ जी ५९०५ ) मधून अष्टविनायक दर्शनासाठी आले होते. ओझर, पाली, लेण्याद्री, महड असा प्रवास करीत ते महाबळेश्वरकडे शनिवारी रात्री आले होते. महाबळेश्वर दर्शन करून या गाडीतील सर्व भाविक गुरेघर येथील बसस्थानकाच्या शेजारील एका हॉटेलमध्ये निवासाला उतरले होते. रविवारी सकाळी ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी गुरेघर बसस्थानकात जमा झाले होते. शंकर चव्हाण हे आपला नातू प्रयाग याला घेऊन बसस्थानकाच्या समोर रस्त्याच्या पलीकडील बाजूस गेले होते. परंतु प्रयागला आजी समोर दिसल्याने तो धावत तिकडे पळत होता. प्रयाग रस्त्याच्या मधोमध येताच महाबळेश्वरकडून येणाऱ्या टेम्पो (एमएच ११ एजी २१५८ ) ने डाव्या बाजूने प्रयागला जोराची धडक दिली. प्रयाग गाडी खाली आल्याने त्याच्या डोके व डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. प्रयागला तातडीने उपचारासाठी बेल एअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु प्रयाग याचा मृत्यू झाला. ऐन गणपतीतच अष्टविनायक दर्शनासाठी आलेल्या या भाविकांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. टेम्पो चालक लक्ष्मण जानू शिंदे (वय ४८, रा. देवळी मुरा-झोळाची खिंड, ता. महाबळेश्वर) याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दुसरी घटनाही महाबळेश्वर-पाचगणी मुख्य मार्गावर तायघाट गावाजवळ घडली. कारचा अपघात होऊन भिलार येथील एक युवक जागीच ठार झाल्याची ही घटना शनिवारी रात्री घडली. नीलेश रामचंद्र भिलारे (वय २६, रा. भिलार) हा युवक कार (एमएच ११ बीएच ५५९९) चालवीत भिलारहून पाचगणीकडे जात होता. रात्री साडेबाराच्या सुमारास तायघाट गावच्या हद्दीत भुंडा बंगल्याजवळ त्याचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे कार थेट रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या इलेक्ट्रीक पोलवर धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, इलेक्ट्रीक पोल पूर्णपणे रस्त्यावर कोसळला. परंतु गाडी वेगाने १०० फूट पुढे जाऊन पलटी झाली. धडकेत कारचे टायर फुटून बाजूला गेले होते. या अपघातात नीलेश गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती एका पर्यटक गाडीतील लोकांनी पाचगणी येथे बाजारात उभ्या असणाऱ्या प्रतीक हेमंत देसाई (वय २६) याला दिली. प्रतीकने लागलीच आपल्या मित्रांसह अपघाताचे ठिकाण गाठले व नीलेशला गाडीतून बाहेर काढले. वाईतील रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (वार्ताहर)