शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

तरुणांनी राजकारणात सक्रिय राहावे

By admin | Published: June 21, 2015 9:49 PM

रामराजे नाईक-निंबाळकर : फलटण येथे राष्ट्रवादी युवकचा मेळावा

फलटण : ‘तालुक्यातील तरुणांच्या मनाचा वेध घेऊन राजकीय सत्तेच्या माध्यमातून गेली २२ वर्षे कृषी, औद्योगिक, शिक्षण क्षेत्रांत विकासाचे पर्व निर्माण करण्यात यश मिळाले. तालुक्याचा विकास गतिमान झाल्याच्या पार्श्वभूमीवर यापुढे तरुणांनी विकासकामाची जबाबदारी घेण्यासाठी पुढे आले पाहिजे. तालुक्याच्या विकासाची परंपरा अखंडित राहण्यासाठी तरुणांनी राजकारणात सक्रिय सहभागी व्हावे,’ असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.फलटण तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने युवक मेळावा आणि विधानपरिषदेच्या सभापतिपदी निवड झाल्याबद्दल सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील होते. यावेळी आ. दीपक चव्हाण, माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे, बाळासाहेब सोळसकर, संजीवराजे नाईक-निंबाळकर, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, पंचायत समिती सभापती स्मिता सांगळे, नगराध्यक्षा सारिका जाधव, श्रीराम कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. नितीन भोसले, सुभाषराव शिंदे, महादेव पवार, डी. के. पवार आदी उपस्थित होते.रामराजे म्हणाले, ‘तालुक्यातील तरुणांच्या विविध प्रश्नांच्या भावनेतून आपल्या राजकीय विचारांचा जन्म झाला. त्या विचारांना पहिल्यापासूनच युवकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला, त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेपासून विधानसभेपर्यंतच्या राजकीय सत्तेच्या संधी मिळाल्या. संघर्षातून राजकीय सत्तास्थाने मिळवून देण्यात युवाशक्तीचे योगदान होते. शरद पवार यांच्यासारख्यांची साथ मिळाली. त्यातूनच तालुक्यात विकासाची घोडदौड सुरू ठेवली.’सुप्रिया सस्ते, प्रशांत निंभोरे, पराग भोईटे, किशोरसिंह निंबाळकर, अमोल भोईटे, भाऊसो सोनवलकर, राजेंद्र पवार आदींनी समस्या मांडल्या.कार्यक्रमाला युवक उपस्थित होते. जयकुमार इंगळे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. राजश्री शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)रामराजेंनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या...‘राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या बाहेर असूनही विधान परिषदेच्या माध्यमातून फलटणला लालदिवा मिळाला, हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. शरद पवार यांनी रामराजेंवर अनेक जबाबदाऱ्या टाकल्या, त्या त्यांनी यशस्वी करून दाखविल्या असे उमेश पाटील यांनी सांगितले.’