सातारा : ‘आपले गाव स्वच्छ, सुंदर, निसर्गसंपन्न आणि विकसित असायला हवे. ग्रामस्थांना अपेक्षित विकासकामे मार्गी लावून ग्रामपंचायतीने गावाला आदर्श गाव बनविले पाहिजे आणि त्यासाठी युवकांचे योगदान गरजेचे आहे,’ असे मत कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांनी व्यक्त केले.
कोंडवे येथे महेश गाडे मित्रसमूहाच्यावतीने रक्तदान शिबिर आणि गरजू लोकांना अन्नधान्य किट वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर, अजिंक्यतारा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, ज्येष्ठ नेते शिवराम घोरपडे, मधुकर निंबाळकर, महेश गाडे, सरपंच किरण गाडे, उपसरपंच सुलभा भुजबळ आदींची उपस्थिती होती.
गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन यावेळी वेदांतिकाराजे भोसले यांनी दिले. कार्यक्रमात रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सीमा जाधव, मोहित चोरगे, बजरंग दीक्षित, नवनाथ जाधव, संभाजी इंदलकर, राहुल काळे, अमोल मेणकर, पत्रकार बाळू मोरे, अरुण पवार, दीपक भुजबळ, मनोज साळुंखे, विक्रम वाघमळे, प्रवीण पवार, विकास साळुंखे, मनोज घाडगे व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : १५ कोंडवे रक्तदान शिबिर
कोंडवे येथील कार्यक्रमात वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला.