शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

पोलीस ठाण्यातच युवकाचा कोयत्याने सपासप वार करून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 4:54 PM

पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाचा पोलीस ठाण्यातच कोयत्याने सपासप वार करून निर्घुण खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी 11 वाजता सातार्‍यात घडली.

ठळक मुद्देपोलीस ठाण्यातच युवकाचा कोयत्याने सपासप वार करून खूनपोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, घटनास्थळाचा पंचनामा

सातारा: पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाचा पोलीस ठाण्यातच कोयत्याने सपासप वार करून निर्घुण खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी 11 वाजता सातार्‍यात घडली.सुरेश कांबळे वय 35 राहणार सैदापूर तालुका सातारा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून रामा तुकाराम दुबळे राहणार सैदापूर असे संशयित आरोपीचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की दोन दिवसांपूर्वी सुरेश कांबळे आणि रामा दुबळे यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला होता. या वादातून रामा दुबळे याने सुरेश कांबळे यांच्या विरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीसाठी सातारा तालुका पोलिसांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता दोघांनाही पोलिस ठाण्यात बोलावले होते. सुरुवातीला रामा दुबळे हा पोलीस ठाण्यात आला होता. मात्र सुरेश कांबळे हा पाठीमागून येणार होता. त्यामुळे तो त्याची वाट पाहत पोलिस ठाण्यासमोर उभा होता.

दोघेही पोलीस ठाण्यात आल्यानंतर समोरासमोर घेऊन पोलीस दोघांमध्ये तोडगा काढणार होते. दरम्यान, रामा दुबळे हा सातारा तालुका पोलीस ठाण्यासमोर उभा राहिला होता. यावेळी सुरेश कांबळे हा अचानक तेथे आला. त्याने स्वतः जवळ असलेल्या कोयत्याने रामा दुबळेवर वार केला. त्याच वेळी सुरेशच्या हातातून कोयता खाली पडला.

हाच कोयता रामा दुबळेने हातात घेतला. त्यावेळी सुरेश कांबळे हा पोलीस ठाण्यात पळत सुटला. त्याच्या पाठोपाठ रामा गेला. त्याने पोलिस ठाण्यात सुरेशच्या पोटावर वार केला. त्यानंतर सुरेश जखमी अवस्थेत पोलीस ठाण्याच्या दारात आला. तेथेही ही रामा दुबळेने सुरेश कांबळेच्या डोक्यात गंभीर वार केले.

या झटापटीत दोन पोलिसही जखमी झाले आहेत. पोलीस ठाण्यात आणि पोलीस ठाण्यासमोर रक्ताचा सडा पडला आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात तत्काळ दाखल केले मात्र उपचारादरम्यान सुरेश कांबळे यांचा मृत्यू झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस ठाण्यातच खून झाल्याने जिल्हा पोलिस दल अक्षरशा हादरून गेले पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. या खुनाची माहिती सैदापूर मध्ये पोचल्यानंतर मोठ्या संख्येने जमा व सातारा तालुका पोलीस ठाण्यासमोर आला होता त्यामुळे पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

टॅग्स :MurderखूनSatara areaसातारा परिसर