शहरं
Join us  
Trending Stories
1
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
2
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
3
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
4
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
5
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
6
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
8
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
9
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
10
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
11
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
12
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
13
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
14
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
15
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
16
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
17
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
18
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
19
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल

पोलीस निरीक्षकांच्या कक्षातच युवकावर चाकूने वार, कऱ्हाडातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 8:58 PM

Crimenews Satarapolice- अदखलपात्र गुन्ह्याच्या चौकशीकामी पोलीस ठाण्यात आणलेल्या आरोपीने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनातच फिर्यादीवर चाकूने सपासप वार केले. त्यामध्ये फिर्यादी युवक गंभीर जखमी झाला. पोलीस निरीक्षकांनी तातडीने झडप घालून आरोपीला ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. येथील शहर पोलीस ठाण्यात सोमवारी ही दुपारी घटना घडली.

ठळक मुद्देपोलीस निरीक्षकांच्या कक्षातच युवकावर चाकूने वार, कऱ्हाडातील घटना अदखलपात्र गुन्ह्यात चौकशी सुरू असताना आरोपीचे कृत्य

कऱ्हाड : अदखलपात्र गुन्ह्याच्या चौकशीकामी पोलीस ठाण्यात आणलेल्या आरोपीने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनातच फिर्यादीवर चाकूने सपासप वार केले. त्यामध्ये फिर्यादी युवक गंभीर जखमी झाला. पोलीस निरीक्षकांनी तातडीने झडप घालून आरोपीला ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. येथील शहर पोलीस ठाण्यात सोमवारी ही दुपारी घटना घडली.किशोर पांडुरंग शिखरे (२७, रा. हजारमाची, ता. कऱ्हाड) असे चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी लखन भागवत माने (४०, रा. हजारमाची) याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारमाची येथील लखन माने व किशोर शिखरे यांच्यात पूर्वीपासून वाद आहे. त्या वादाच्या कारणावरून किशोरला घाबरून लखन हा पंढरपूरमध्ये राहण्यास गेला होता. त्याठिकाणी विठ्ठल मंदिरात येणाऱ्या भाविकांना गोपीचंद टिळा लावण्याचे काम तो करीत होता.

किशोर शिखरेच्या वडिलांशी लखनचे नेहमी फोनवरून बोलणे होत होते. किशोरला ते मान्य नव्हते. माझ्या वडिलांशी बोलू नकोस, असे तो लखनला सांगत होता. त्यावरूनही त्यांच्यात वाद झाला होता. त्यातच लखनने २५ फेब्रुवारी रोजी दुपारी किशोरला फोन करून ठार मारण्याची धमकी दिली होती.

याबाबत किशोरने कऱ्हाड शहर पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावरून लखन माने याच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद झाला होता. सोमवारी या गुन्ह्यात चौकशीकामी लखन व किशोरला पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते.सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास किशोर शिखरे पोलीस ठाण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी त्यांच्या कक्षात त्याचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर अर्ध्या तासाने लखन माने त्याठिकाणी आला.

चौकशीकामी निरीक्षक पाटील यांनी त्यालाही कक्षात बोलवले. मात्र, कक्षात जाताच लखनने स्वत:जवळ असलेल्या चाकूने किशोरवर सपासप वार केले. हे वार किशोरच्या पाठीत, मानेवर आणि हातावर बसले.

क्षणात घडलेल्या या घटनेमुळे पोलीसही हादरले. वरिष्ठ निरीक्षक पाटील यांनी तातडीने लखन मानेला पकडले. तसेच जखमी किशोर शिखरेला उपचारार्थ रुग्णालयात पाठविण्यात आले. याबाबतची नोंद कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिसKaradकराड