सातारा: पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील लिंबखिंड परिसरात अज्ञात टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी साठेआठच्या सुमारास झाला.रामसिंग धीरज सावरिया (वय ३५, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. करंजे पेठ, सातारा), अमोल सावंत (वय २२, रा. भूविकास बँक परिसर, सातारा) अशी जखमी युवकांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सावरिया आणि सावंत हे दोघे साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीत काम करतात.शुक्रवारी रात्री हे दोघे वाई येथे मित्राकडे गेले होते. सकाळी परत दुचाकीवरून येत असताना लिंबखिंडनजीक या दोघांना अज्ञात टेम्पोने पाठीमागून धडक दिली. या धडकेत दोघेही जखमी झाले. या दोघांना एका कार चालकाने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांच्या मित्रांनी पुढील उपचारासाठी त्यांना खासगी दवाखान्यात नेले.अज्ञात टेम्पो चालक घटनास्थळावरून टेम्पोसह पसार झाला असून, हा अपघात एका कार चालकाने पाहिला. मात्र, त्याला संबंधित टेम्पोचा नंबर घेता आला नाही, असे पोलिसांनी सांगितले.
टेम्पोच्या धडकेत युवक गंभीर जखमी, लिंबखिंडनजीक अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 5:55 PM
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील लिंबखिंड परिसरात अज्ञात टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी साठेआठच्या सुमारास झाला.
ठळक मुद्देटेम्पोच्या धडकेत युवक गंभीर जखमी, लिंबखिंडनजीक अपघातजखमींना कार चालकाने आणले रुग्णालयात