ठळक मुद्देचौकांबरोबरच गल्लो गल्लीत जिलेबी दुकानेपरस्परांच्या घरी जिलेबी देण्याची अनोखी पध्दत स्वातंत्र्यनंतर राऊत या व्यावसायिकाने जिलेबी वाटलीसातारकरांची परंपरा अखंडीत सुरू
सातारा : स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला सातारा शहरातील मुख्य चौकांबरोबरच गल्लो गल्लीत जिलेबी दुकाने थाटण्यात आली आहेत. परस्परांच्या घरी जिलेबी देण्याची अनोखी पध्दत यंदाही पहायला मिळणार आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सातारा शहरात राऊत या व्यावसायिकाने मुख्य चौकात जिलेबी वाटली स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा केला होता. तेव्हापासुन सातारकरांनी ही परंपरा अखंडीत सुरू ठेवली आहे. अजूनही ध्वजवंदना झाल्यानंतर मित्र आणि आप्तेष्टांकडे जिलेबी घेवुन जाण्याची प्रथा अद्यापही सुरूच आहे.