औंध : ‘कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सर्व विभागाशी संबंधित अडचणी प्राधान्याने सोडवत आली आहेत. मी जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद तथा जिल्हा नियोजन समिती सदस्या सुनीता कदम यांनी केले.
त्रिमली येथे जिल्हा नियोजन समिती निधीतून दुरुस्त केलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी धैर्यशील कदम, सभापती जयश्री कदम, सरपंच जयश्री येवले, उपसरपंच संजय येवले, विस्ताराधिकारी नंदकुमार माने, डॉ. अमित ठिगळे, पोलीस पाटील शंकर पवार, ग्रामसेवक विपुल काकडे, सूर्यजित देशमुख उपस्थित होते.
कदम म्हणाल्या, ‘सध्याचा काळ अत्यंत कठीण असून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा उपलब्ध पाहिजेत. या दृष्टिकोनातून आमचे काम सुरू आहे. कऱ्हाड उत्तरचे नेते धैर्यशील कदम यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने विकासकामे मंजूर करून संपूर्ण पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचा कायापालट करणार आहे.’
धैर्यशील कदम, डॉ. अमित ठिगळे, विस्ताराधिकारी नंदकुमार माने यांनी मनोगत व्यक्त केले.
ग्रामपंचायत सदस्य स्वाती भोसले, शेषीताई गुरव, सचिन येवले, अरुणा येवले, दादासाहेब भोसले, विश्वनाथ कदम, संजय भालेराव, रामचंद्र येवले उपस्थित होते. महादेव पवार यांनी प्रास्ताविक केले. भीमराव येवले यांनी आभार मानले.