सातारा : जिल्हा परिषदेची स्थायी आणि जलसंधारण समितीची सभा शुक्रवारी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
शुक्रवार, ७ मे रोजी सकाळी ११ वाजता जलसंधारण आणि दुपारी १ वाजता स्थायी समितीची सभा होणार आहे. जिल्हा परिषदेतून या सभेला अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अर्थ व शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी समिती सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सोनाली पोळ यांच्यासह अधिकारी सहभागी होणार आहेत. तर तालुकास्तरावरून समितीचे सदस्य सहभागी होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
.........................................................................