शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

जिल्हा परिषद जपणार ‘माती अन् माणसं’

By admin | Published: March 25, 2015 11:29 PM

अंदाजपत्रकाला मंजुरी : समाजकल्याण, ‘जलयुक्त शिवार’ला झुकते माप

सातारा : जिल्हा परिषदेच्या २०१५-१६ साठीच्या २५ कोटी ५४ लाखांच्या अंदाजपत्रकाला बुधवारी झालेल्या सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. अर्थ व शिक्षण सभापती अमित कदम यांनी हा अर्थसंकल्प मांडला. जिल्ह्यासाठी वैविध्यपूर्ण योजनांचा या अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला आहे. या अंदाजपत्रकामध्ये समाजकल्याण विभागाला झुकते माप देण्यात आले आहे.अंदाजपत्रकाच्या मंजुरीसाठी सभा आयोजित केली होती. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास यांची प्रमुख उपस्थिती होती. या अंदाजपत्रकात शिक्षण विभागाकरिता २०० लाख, कृषी विभागाकरिता १०० लाख, आरोग्य विभागाकरिता ८० लाख, समाजकल्याण विभागाकरिता २८५.९१ लाख, महिला व बालकल्याण विभागाकरिता १०४.४२ लाख, अशी निधीची तरतूद करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेकडील कृषी, लघु पाटबंधारे तथा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने शासनाने जाहीर केलेल्या जलयुक्त शिवाराकरिता जास्तीचा निधी देऊन जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत निर्माण करून शेतीसाठी मुबलक पाणीसाठा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद काम करीत असल्याचेही सभापती अमित कदम यांनी सांगितले.प्राथमिक शिक्षण, आरोग्य, कृषी विकास या बाबींवर जिल्हा परिषदेने जास्त भर दिला असून, आगामी वर्षात अनेक नवनवीन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील जनतेचे जीवन अधिक सुखकर होण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध असल्याचेही अमित कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)विरोधकांचा गोंधळ...पेल्यातले वादळ!जिल्हा परिषद सदस्यांना अंदाजपत्रकाच्या प्रती मिळणे आवश्यक होते; पण अनेक सदस्यांना त्या मिळाल्या नसल्याने आयोजित केलेली सभा रद्द करावी, अशी मागणी जयवंत जगताप यांनी केली; परंतु त्यांच्या मागणीला विरोधी बाकावरील सदस्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने सभा पुढे सुरू राहिली.