सातारा : जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाºया व जिल्हा परिषदेच्या मालकीच्या राज्यातील पहिल्या आॅडिटोरिअमचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी (दि. १३) उद्घाटन झाले.खासदार शरद पवार यांनी फित कापून आॅडिटोरिअम या वास्तूचे उद्घाटन केले. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, राष्ट्रवादीचे सुरेंद्र्र गुदगे, खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शंभूराज देसाई, आमदार जयकुमार गोरे, आमदार नरेंद्र पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, जिल्हा परिषदेचेमाजी अध्यक्ष सुभाष नरळे, रणजित देशमुख आदी मान्यवर उपस्थितहोते.१२०० खुर्च्यांची क्षमता...पश्चिम महाराष्ट्रातील पहिलाच भव्य असा आॅडिटोरिअम हॉल उभा करताना जिल्हा परिषदेला निधीच्या अडचणीला सामोरे जावे लागले होते. एकूण १४ कोटी ५८ लाख रुपये खर्चून हा आॅडिटोरिअम हॉल तयार करण्यात आला आहे. १२०० खुर्च्यांची क्षमता असणारा हा हॉल जिल्हा परिषदेच्या मालकीचा राज्यातील पहिलाच हॉल ठरला आहे. सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या आकाराचा आॅडिटोरिअम उपलब्ध व्हावा, यासाठी कलाकार, दिग्दर्शक, निर्मातेही प्रतीक्षेत होते.
जिल्हा परिषदेचा आॅडिटोरिअम प्रेक्षकांसाठी खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 1:18 AM