जास्तीत जास्त महिलांना वाटतं की, त्या अनेक वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवत असल्याने त्यांना त्याबाबत सगळं काही माहीत आहे. तसेच याबाबत त्यांना कुणीही काहीही सल्ला देण्याची आवश्यकता नाही. पण सत्य हे आहे की, इतक्या वर्षांपासून जरी त्या शारीरिक संबंध ठेवत आल्या असल्या तरी अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या त्यांना माहीत नसतात. अशात महिलांना माहीत असाव्या अशा ५ गोष्टी सांगणार आहोत.
१) योग्य पोजिशन - प्रत्येक महिलेची एक शारीरिक संबंधाची एक खास सेक्स पोजिशन किंवा खास अवस्था असते, ज्यात त्यांना परमोच्च आनंद मिळतो. त्यामुळे गरजेचं आहे की, तुम्ही तुमची खास किंवा परमोच्च आनंद देणारी पोजिशन ओळखली पाहिजे. अनेकदा महिला वेगळे प्रयोग करण्यासाठी लाजतात किंवा त्यांना सहजता वाटत नाही. पण त्यांनी तसं न करता नाविन्याचा शोध घेतला पाहिजे.
२) पोजिशन बदलू शकते - असंही होऊ शकतं की, वाढत्या वयामुळे, मुलांच्या जन्मामुळे आणि दुसऱ्या बायोलॉजिकल कारणांमुळे तुमच्या पोजिशनमध्ये बदल येऊ शकतो. अशात नव्याने त्या पोजिशनचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. कारण त्या पोजिशनमध्ये तुम्हाला परमोच्च आनंद मिळेल.
३) इंटरेस्ट गरजेचा - जर शारीरिक संबंधात तुमचा इंटरेस्ट कमी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्यात इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कारण लैंगिक क्रिया जेवढी नियमित केली जाईल, तुमचा इंटरेस्ट तेवढा वाढला जाईल. पण त्यात सतत काहीतरी नवीन करण्यावर भर दिला पाहिजे. तेव्हाच त्यात तुमचा इंटरेस्ट वाढेल.
४) झोपही गरजेची - जर तुम्ही शारीरिक संबंधाऐवजी झोपेला महत्व देत असाल तर त्यात काही चूक नाहीये. असं होऊ शकतं की, जास्त थकव्यामुळे मूड नसेल. पण या गोष्टीसाठी स्वत:ला दोषी समजू नका. वेळेचं योग्य नियोजन करून तुम्ही शारीरिक संबंध ठेवू शकता.
५) लव्हमेकिंग म्हणजे वेदना नाही - लैंगिक क्रियेदरम्यान वेदना होणे स्वाभाविक बाब आहे. पण जर एखाद्या महिलेला इंटरकोर्सवेळी नेहमीच वेदना होत असेल तर ही बाब सामान्य नाही. आपल्या पार्टनरसोबत याबाबत बोला आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या.