शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

लग्नानंतर शारीरिक संबंधाबाबत काय विचार करतात भारतीय पुरूष? रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 11:21 AM

Family health Survey : २०१९-२०२१ मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर ८० टक्के महिला आणि ६६ टक्के पुरूषांनी सांगितलं की, पत्नीने पतीला शारीरिक संबंधासाठी नकार (Sex Life) देण्यात काही चुकीचं नाही.

Family health Survey :  मॅरिटल रेपची (Marrital Rape) चर्चा होत असताना म्हणजे पतीने जबरदस्ती पत्नीसोबत संबंध ठेवण्याच्या विषयाची चर्चा होत असताना नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-५ चा भारतीयांच्या बेडरूम लाइफवर एक महत्वाचा रिपोर्ट समोर आला आहे. २०१९-२०२१ मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर ८० टक्के महिला आणि ६६ टक्के पुरूषांनी सांगितलं की, पत्नीने पतीला शारीरिक संबंधासाठी नकार (Sex Life) देण्यात काही चुकीचं नाही.

या सर्व्हेमध्ये शारीरिक संबंधाला नकार देण्याची तीन कारणे दिली गेली होती. पहिलं जर पतीला कोणत्या प्रकारचा लैंगिक विकार असेल, जर पतीने दुसऱ्या महिलेसोबत संबंध ठेवले असतील किंवा पत्नी थकलेली  असेल किंवा तिचा मूड नसेल. सर्व्हेमध्ये सहभागी ८ टक्के महिला आणि १० टक्के पुरूषांना वाटतं की, यातील कोणत्याही कारणाने पत्नी शारीरिक संबंधासाठी नाही म्हणू शकत नाही.

या रिपोर्टमधून समोर आलं की, देशातील ८२ टक्के महिलांचं मत आहे की, त्या त्यांच्या पतीला शारीरिक संबंधासाठी नकार देऊ शकतात. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी गेल्या आठवड्यात हा रिपोर्ट रिलीज केला.या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, पाचमधील चारपेक्षा जास्त (८२ टक्के) महिला आपल्या पतीला शारीरिक संबंधासाठी नकार देतात. पतीला शारीरिक संबंधासाठी नाही म्हणणाऱ्या महिलांची सर्वाधिक संख्या गोव्यामध्ये (९२ टक्के) आहे. तर अरूणाचल प्रदेशमध्ये (६३ टक्के) आणि जम्मू-काश्मीरमध्ये(६५ टक्के) ही संख्या सर्वात कमी आहे.

जेंडर अॅटिट्यूडची माहिती मिळवण्यासाठी या सर्व्हेमध्ये पुरूषांना इतरही काही प्रश्न विचारण्यात आले. हे प्रश्न त्या परिस्थितींशी निगडीत होते जेव्हा पत्नी आपल्या पतीची इच्छा असूनही शारीरिक संबंधासाठी नकार देतात.

पुरूषांना विचारण्यात आलं होतं की, पत्नीने संबंध ठेवण्यास नकार दिल्यावरही ते चार पद्धतीने वागतात का? जसे की, राग व्यक्त करणे, पत्नीला काहीबाही बोलणे, पत्नीला घर खर्चासाठी पैसे न देणे, मारहाण करणे, पत्नीची इच्छा नसताना जबरदस्ती संबंध ठेवणे किंवा दुसऱ्या महिलेसोबत संबंध ठेवणे यांचा समावेश आहे.

सर्व्हेत १५-४९ वयोगटातील केवळ सहा टक्के लोकांचं मत आहे की, जर पत्नी शारीरिक संबंधाला नकार देत असेल त्यांच्याकडे या चारही पद्धतीने वागण्याचा अधिकार आहे. सर्व्हेतील ७२ टक्के पुरूषांनी या चारपैकी कोणताही पर्याय निवडला नाही. १९ टक्के पुरूषांचं मत आहे की, पत्नीने संबंधाला नकार दिल्यावर पत्नीवर रागावण्याचा किंवा तिला ओरडण्याचा त्यांना अधिकार आहे.

सर्व्हे सांगतो की, जवळपास सर्वच राज्यात या चार पर्यायांपैकी एकाशीही सहमत नसणाऱ्या पुरूषांची संख्या ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर पंजाबमध्ये २१ टक्के, चंडीगढमध्ये २८ टक्के, कर्नाटकमध्ये ४५ टक्के आणि लडाखमध्ये ४६ टक्के पुरूषांनी यातील कोणत्याही पर्यायाशी सहमत नसणाऱ्या पुरूषांची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. 

तसेच या सर्व्हेतून समोर आलं की, विवाहित महिलांमध्ये रोजगाराचा दर ३२ टक्के आहे. तर याआधीच्या सर्व्हेमध्ये हा दर ३१ टक्के होता. या ३२ टक्के महिलांपैकी १५ टक्के महिलांना त्यांचा पगारही मिळत नाही आणि यातील १४ टक्के महिला हेही विचारू शकत नाहीत की, त्यांचे पैसे कशात खर्च झाले. 

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनrelationshipरिलेशनशिपHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सResearchसंशोधन