बॉलिवूडमध्ये आता पुन्हा एक नवीन कॅम्पेन सुरू होईल असं वाटतंय. यावेळी चर्चा रंगली आहे ती फेक ऑर्गॅज्मची. अभिनेत्री पूजा बेदीने याबाबत पुढाकार घेतला असून या अभियानाशी याआधीच अभिनेत्री स्वरा भास्कर, सलोनी चोप्रा, अपारशक्ती खुराणा जोडल्या गेल्या होत्या. या अभिनेत्रींनी सोशल मीडियावर #IFakedItToo असं कॅम्पेन सुरू केलं आहे.
कंडोमच्या एका ब्रॅन्डनुसार, भारतात ७० टक्क्यांपेक्षा अधिक महिलांना प्रत्येकवेळी शारीरिक संबंधादरम्यान ऑर्गॅज्मचा अनुभव मिळत नाही. आता या मुद्यावर पूजा बेदी या कंडोमच्या ब्रॅन्डसोबच जोडली गेली आहे. कंडोम ब्रॅन्डच्या ऑफिशिअल पेरवरून पूजाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती फेक ऑर्गॅज्मबाबत महिलांच्या प्रश्नांना उत्तरे देणार असं सांगत आहे.
काय आहे फेक ऑर्गॅज्म?
मुळात फेक ऑर्गॅज्म किंवा ऑर्गॅज्म काय असतं हे लोकांना माहीत आहे की नाही यावरच शंका आहे. त्यामुळे फेक ऑर्गॅज्म काय आहे हे समजून घेऊ. ऑर्गॅज्म म्हणजे शारीरिक संबंध ठेवताना मिळणारा परमोच्च आनंद. एका सर्व्हेत महिलांना विचारलं गेलं की, त्यांना ऑर्गॅज्मचा अनुभव मिळतो का? यावर सर्व्हेत सहभागी सर्वच महिलांनी यावर नकारात्मक उत्तर दिलं होतं. अशात एक्सपर्ट सांगतात की, अनेकदा महिलांना ऑर्गॅज्मचा अनुभव येत नाही. अशावेळी जोडीदाराला संतुष्टी मिळवून देण्यासाठी महिला परमोच्च आनंद मिळाल्याचं नाटक करतात. यालाच फेक ऑर्गॅज्म म्हणतात.
यावर महिला सांगतात की, ऑर्गॅज्मचा अनुभव मिळत नसल्याने त्या तसं नाटक करू लागतात. जेणेकरून त्यांच्या पार्टनरला वाटू नये की, त्या शारीरिक संबंधासाठी उत्तेजित नाहीत. किंवा असाही गैरसमज होऊ नये की, त्यांना शारीरिक संबंध ठेवायचे नाही.
पुरूषांचं काय?
हा महिलांचा विषय पण फेक ऑर्गॅज्म केवळ महिलाच नाही तर पुरूष करतात. अमेरिकेच्या कॅन्सास यूनिव्हर्सिटीमध्ये २०११ मध्ये २०० पुरुषांवर एक सर्वे करण्यात आला. यातील 25 टक्के पुरुषांनी(50 टक्के महिलांच्या तुलनेत) मान्य केले की, ते शारीरिक संबंधादरम्यान परमोच्च आनंद मिळाल्याचं खोटं खोटं भासवतात.
काय आहे असं करण्याचं कारण?
याचं कारण म्हणजे त्यांना जेव्हा असं वाटतं की, ते परमोच्च आनंदापर्यंत पोहोचू शकत नाही, तेव्हा पुरुष असं करतात. जेव्हा शारीरिक संबंधाला जास्त वेळ लागत असेल किंवा त्यांना हे क्रिया लवकर संपवायची असेल तेव्हाही ते परमोच्च आनंद मिळल्याचं खोटं खोटं भासवतात.