(Image Credit : www.joya.life)
शारीरिक संबंधादरम्यान एक चूक जास्तीत जास्त लोक करतात ती म्हणजे केवळ आणि केवळ इंटरकोर्सवर फोकस करणे. त्याआधीच्या आणि नंतरच्या क्षणांवर त्यांचं लक्ष नसतं. शारीरिक संबंधाला १०० मीटर रेस समजू नका, ज्यात लवकरात करत आणि कमीत कमी मिनिटात संपवण्याची घाई असते. त्याऐवजी शारीरिक संबंधाला मॅरेथॉनसारखं समजा, ज्यात तुम्ही फोरप्ले आणि आफ्टरप्लेवर जितकं जास्त लक्ष केंद्रीत कराल तितका तुम्हाला इंटरकोर्समध्ये आनंद येईल.
उत्तेजना वाढवतो फोरप्ले
शारीरिक संबंध ठेवण्याआधी फोरप्लेचं महत्त्व अधिक आहे. जर योग्यप्रकारे फोरप्ले केला गेला तर दोघांमध्येही उत्तेजना अधिक वाढते. दोघेही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या एक झालेले असतात. अशात इंटरकोर्ससाठी योग्य वातावरण तयार झालेलं असतं. दोघांमध्ये सामंजस्य नसलं तर एक चांगला फोरप्ले आणि एक चांगली लैंगिक क्रियाही निष्फळ ठरते.
लोक करतात ही चूक
जर लैंगिक क्रियेनंतर दोघेही बेडच्या वेगवेगळ्या कॉर्नरला जाऊन झोपत असतील किंवा आपलं सोशल मीडिया अकाऊंड चेक करत असतील किंवा लगेच बेडरुमबाहेर जात असतील, टीव्ही बघत असतील तर तुम्हाला आफ्टरप्ले आवर्जून ट्राय करण्याची गरज आहे.
आफ्टरप्लेने वाढतो आनंद
सामान्यपणे ऑर्गॅज्म मिळवण्यासाठी एकमेकांना जवळ घेणे, बोलणे, चुंबन घेणे अशा गोष्टीचं फार महत्त्व आहे. जसं चांगल्या लैंगिक क्रियेसाठी फोरप्लेचं महत्त्व आहे. तसंच इंटरकोर्सनंतर आफ्टरप्लेचं महत्त्व आहे. जोडीदारासोबत काही प्रेमाच्या गोष्टी करा, एकमेकांना जवळ घ्या. तुम्हाला जर वाटत असेल की, शारीरिक संबंधांनंतरही तुमचं जोडीदारासोबत कनेक्शन चांगलं व्हावं तर सामान्यपणे आफ्टरप्लेसाठी किमान २० मिनिटे वेळ काढणे गरजेचे आहे.