(Image Credit : tvklan.al)
शारीरिक संबंध हा दोन शरीरांसोबत दोन मनांना आनंद आणि हव्याहव्याशा वाटणाऱ्या वेदना देणारा अनुभव असतो. पण शारीरिक संबंध ठेवताना महिलांना अधिक वेदना होतात. हेही तितकच खरं आहे. त्यामुळे त्यांना लुब्रिकंटचं महत्त्व माहिती असतं. त्यामुळे अलिकडे बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लुब्रिकंटचा वापर अनेकजण करताना दिसतात. पण हे लुब्रिकंट तुमचा मार्ग सोपा करत असलं तरी त्याचे वेगवेगळे दुष्परिणामही भोगावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे लुब्रिकंटचा वापर करण्याआधी ते वापरताना केल्या जाणाऱ्या चुका जाणून घेऊयात, ज्या धोकादायक ठरु शकतात.
तेलाचा वापर टाळावा
महिलांच्या गुप्तांगाचा कोरडेपणा घालवण्यासाठी आणि त्वचेचं घर्षण टाळण्यासाठी अनेकजण खोबऱ्याच्या तेलाचा किंवा इतरही तेलांचा वापर करतात. पण या तेलांमुळे तुम्हाला गंभीर संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो. याचं मुख्य कारण म्हणजे लुब्रिकंट म्हणून वापरलेलं तेल सामान्य लुब्रिकंटप्रमाणे लघवीच्या माध्यमातून बाहेर पडत नाही. त्यामुळे दोघांच्याही गुप्तांगामध्ये खाज किंवा संक्रमण होण्याची शक्यता असते.
थूंकीचा वापर टाळा
थूंकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हजारो जीवाणू असतात आणि गुप्तांगांच्या लुब्रिकेशनसाठी याचा वापर केला गेला तर गंभीर समस्या होऊ शकतात. यात खाज, संक्रमण यांचा समावेश करता येईल. त्यामुळे कधीही थूंकीचा वापर करु नये. तज्ज्ञांच्या सल्ल्याने लुब्रिकंट वापरावा.
फ्लेवर्ड लुब्रिकंट टाळा
फ्लेवर्ड लुब्रिकंटमुळे अनेकदा योनीचं पीएच बॅलन्स बिघडतं. या दुष्परिणामामुळे संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो. तरी सुद्धा तुम्हाला फ्लेवर्ड लुब्रिकंटचा वापर करायचा असेल तर तज्ज्ञ सांगतात की, त्यात वेगळे काही तत्व असू नये याची काळजी घ्यावी.
जेलचा वापर टाळा
काहीजण हे लुब्रिकंट म्हणून कंडिशनर किंवा बॉडी जेलचाही वापर करत असल्याचं आढळलं आहे. तज्ज्ञांनुसार याचा वापर टाळावा. याने अॅलर्जी होण्याचा धोका वाढतो. तसेच या गोष्टींचा वापर करुन कंडोम फाटण्याचीही भीती असते.
कसं लुब्रिकंट वापरावं?
तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की, तुमचं लुब्रिकंट हे पेट्रोकेमिकल नसलेलं, ग्लिसरीन नसलेलं आणि पॅराबीन नसलेलं असावं. पण याचा वापर करण्याआधी याची गरज आहे का? किंवा हे योग्य ठरेल का? हे तज्ज्ञांकडून जाणून घ्यावं. तरच या लुब्रिकंटचा वापर करावा.