शारीरिक संबंध वैवाहिक जीवनाला मजबूत करणारा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. पण अनेकदा अशा काही समस्या होतात ज्यामुळे लैंगिक जीवन वेगवेगळ्या समस्यांनी वेढलं जातं. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात शरीर, मेंदू, हार्मोन्स आणि भावनांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. पण कधी कधी सगळंकाही ठिक असून सुद्धा अनेकजण शारीरिक संबंध टाळतात. खरंतर हे समजून घेणं गरजेचं आहे. कदाचित तुम्हाला सेक्स अॅलर्जीही असू शकते.
खाज
शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लगेच तुम्हाला गुप्तांगामध्ये खाज येत असेल तर तुम्हाला यीस्ट इन्फेक्शन असण्याची दाट शक्यता आहे. जर खास केवळ शारीरिक संबंधानंतरच होत असेल तर आणि दुसरं काही कारण नसेल तर तुमच्या जोडीदाराचं वीर्य याला कारणीभूत आहे हे समजा. तरी सुद्धा एकदा डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन योग्य ते उपचार करावे.
जळजळ
जर शारीरिक संबंधानंतर खासकरून जोडीदाराच्या इजॅक्युलेशननंतर तुमच्या गुप्तांगात जळजळ होत असेल तर वेळीच एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. यावर काहीही घरगुती उपाय करू नका.
ऑर्गॅज्मने आजारी पडणे
जर तुम्ही पुरूष असाल आणि तुम्हाला इजॅक्युलेशनच्या लगेच नंतर ताप आल्यासारखं वाटत असेल, नाक वाहत असेल, डोकं दुखत असेल म्हणजे फ्लूसारखी लक्षणे दिसत असतील तर तुम्हाला सीमनची अॅलर्जी आहे. ही एक फार कमी आढळणारी स्थिती आहे. याला पोस्ट ऑर्गॅज्मक इलनेस सिंड्रोम असं म्हणतात.
कंडोमची अॅलर्जी
कंडोमचा वापर केल्यावर तुमची खास किंवा जळजळसारखं काही होत असेल तर तुम्हाला लेटेक्सची अॅलर्जी आहे. कंडोम हे लेटेक्सपासून तयार केलेले असतात. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे लेटेक्सने तयार केलेले कंडोम वापरू नका.
रॅशेज आणि सूज
अनेकदा तुम्ही जे लुब्रिकंट वापरता त्यामुळेही तुम्हाला अॅलर्जी होऊ शकते. असं असेल तर लुब्रिकंट बदलून बघा. तसेच जर तुम्हाला लैंगिक क्रियेनंतर गुप्तांगावर सूज येण्याची समस्या असेल तर याला कंडोमचं लेटेक्स किंवा लुब्रिकंट जबाबदार आहे. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.