वैवाहिक जीवनात काही वर्षांनी लैंगिक जीवनात तोच तो पणा असल्याने कंटाळा येऊ लागतो. अशात लैंगिक जीवनात नवा जोश आणि उत्साह भरण्यासाठी अनेकजण मित्रांशी बोलून, काही मॅगझिन वाचून किंवा इंटरनेटवर दिली जाणारी माहितीवर विश्वास ठेवून तशा गोष्टी करू लागतात. पण या फुकटच्या सल्ल्यांवर, सेक्स ट्रिक्स आणि सेक्स टिप्सवर विश्वास ठेवणं कधी कधी महागातही पडू शकतं. अशावेळी कोणत्या गोष्टी करू नये हे खालीलप्रमाणे सांगता येईल.
पदार्थ किंवा फळांचा वापर करणे
चॉकलेट क्रीम, विप्ड क्रीम, फ्रूट ज्यूस यांसारख्या गोष्टींचा वापर पार्टनरच्या संवेदनशील आणि कामेच्छा जागवणाऱ्या अवयवांवर टाकणे आणि चाटणे, हे ऐकायला भलेही फारच वेगळं आणि हॉट वाटत असलं तरी घातक आहे. असं केल्याने इन्फेक्शनचा धोका अधिक वाढतो.
पार्टनरला ओरबाडणे किंवा चावणे
अनेक इरॉटिक सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, शारीरिक संबंधावेळी काही महिला अतिउत्साहात पुरूष जोडीदाराला नखांनी ओरबाडते. तर काही चावतात देखील. पण अशाप्रकारे नखांनी ओरबाडल्याने किंवा चावल्याने उत्तेजना वाढेलच असं नाही. उलट असं करून पार्टनरला जखम होण्याची भीती अधिक असते. तसेच मूडही बिघडू शकतो.
कारमध्ये शारीरिक संबंध
भलेही पॉर्न सिनेमात किंवा हॉलिवूड सिनेमात कारमध्ये शारीरिक संबंध ठेवल्याने अधिक आनंद मिळत असल्याचं दिसत असलं तरी सर्वसामान्यांसाठी हे योग्य ठरणार नाही. तुम्ही जर योग्य तेवढे फ्लेक्सिबल नसाल तर तुमचा इजा होण्याचा धोका अधिक असतो.
डर्टी टॉक
तुम्ही जर विचार करत असाल तर शारीरिक संबंधादरम्यान डर्टी टॉक करणं सोपं असेल आणि असं करून तुमची उत्तेजना वाढत असेल तुम्ही चुकताय. मुळात डर्टी टॉक हे एक स्कील आहे, ज्यात एक्सपर्टची गरज असते. कदाचित डर्टी टॉकच्या नादात तुम्ही असं काही बोलून जाल की, ज्याने पार्टनरला किळस येईल. अशावेळी मूड खराब होण्याचा धोका अधिक असतो. किंवा तुमची इमेज बिघडण्याचीही भीती असते. त्यामुळे असं काही करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.