(Image Credit : V-Revive)
सामान्यपणे शारीरिक संबंधासाठी कुणालाही कोणतं कारण नको नसतं किंवा तसं कारण कुणी शोधतही नसतं. इच्छा झाली आणि ठेवले संबंध. पण तुम्ही या गोष्टीकडे कधी लक्ष दिलं नसेल की, परमोच्च आनंद म्हणजेच ऑर्गॅज्मचा अनुभव आल्यावर तुम्हाला किती फायदा होतो. तुम्ही भलेही यावर विश्वास ठेवा अथवा नका ठेवू, पण हे खरं आहे. ऑर्गॅज्मचा आरोग्याला अनेक दृष्टीने फायदा होतो.
स्ट्रेसपासून सुटका
जेव्हा तुम्हाला ऑर्गॅज्मचा आनंद मिळतो तेव्हा मेंदूमध्ये सेरोटोनिन नावाचे हार्मोन्स रिलीज होतात. याला फील गुड हार्मोन्सही म्हटलं जातं. याचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. एका रिसर्चमध्ये तर असाही दावा करण्यात आला आहे की, ऑर्गॅज्म फील केल्यानंतर २ आठवड्यांपर्यंत शरीरात स्ट्रेसची लेव्हल कमी राहते.
हार्ट अटॅकचा धोका कमी
जेव्हा तुम्हाला ऑर्गॅज्मचा अनुभव येतो तेव्हा तुमच्या रक्तात एक -दोन नाही तर अनेक प्रकारचे हार्मोन्स रिलीज होतात. ज्यामुळे हृदयाशी संबंधित खासकरुन हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. खासकरुन ज्या महिलांना ऑर्गॅज्मचा अनुभव मिळतो त्यांना हृदयाशी संबंधित रोगांचा धोका कमी असतो.
ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं
अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, ऑर्गॅज्मनंतर पेल्विक फ्लोरमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढतं. ज्यामुळे संपूर्ण शरीरात पोषक तत्व आणि हार्मोन्सचं चांगल्याप्रकारे डिस्ट्रीब्यूशन करण्यास मदत होते.
चांगली झोप
ऑर्गॅज्मनंतर तुमचं शरीर ऑक्सिटॉसिन आणि सेरोटोनिन सारखे हार्मोन्स रिलीज करतं. या हार्मोन्समुळे तुम्हाला चांगली झोप येते. याच कारणामुळे अनेक पुरुषांना शारीरिक संबंधानंतर लगेच झोप लागते.