बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेक विवाहीत जोडप्यांच्या लैंगिक क्षमतेत कमतरता किंवा कामेच्छा कमी बघायला मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या लैंगिक जीवनातील रोमांच नाहीसा झालाय. याला आपल्या खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी आणि इतरही काही सवयी जबाबदार आहेत. हे आहेच की शारीरिक संबंध आरोग्यासाठी फायदेशीर असतं. याने दोन मनं आणि शरीरांना आनंद मिळण्यासोबतच तणाव कमी होतो. अनेक आजारांपासूनही बचाव होतो. पण अलिकडच्या धावपळीच्या जीवनात वेगवेगळ्या कारणांनी अनेकांची शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी झाल्याचे बघायला मिळत आहे. जर तुम्हालाही अशीच काहीशी समस्या असेल तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा. या पदार्थांमुळे तुमचं लैंगिक जीवन रोमांचक होण्यास नक्कीच मदत होईल.
१) केसर
केसरमुळे कामेच्छा वाढवण्याचा एक चांगला घरगुती उपाय आहे. केसरमुळे अॅस्ट्रोजन, सेरोटोनिन आणि कामेच्छा निर्माण करणारे हार्मोन्स वाढवतं. ज्यामुळे तणाव, स्ट्रेस आणि थकवा असला तरी तुमची कामेच्छा जिंवत राहते.
२) बदाम - पिस्ता
बदामातून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई मिळतात, जे कामेच्छा निर्माण करणारे हार्मोन्स रिलीज करतं. बदामासोबतच पिस्ता खाणंही एक चांगला पर्याय आहे. यात कॉपर, मॅग्नेशिअम आणि झिंक हे उत्तेजना वाढवण्यासाठी मदत करतात. तसेच नियमीतपणे बदाम आणि पिस्ता खाल्ल्याने शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ताही वाढते.
३) केळी
केळ्यांमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं. याने लैंगिक क्रियेसाठी शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच यातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्समुळे लैंगिक क्षमताही वाढते. त्यामुळे सुखी लैंगिक जीवनासाठी नियमीतपणे केळी खाणे फायद्याचे ठरेल.
४) कलिंगड
कलिंगडामध्ये फायटोन्यूट्रीएंट्स भरपूर प्रमाणात आढळतात, जे लैंगिक जीवन सुखकर करण्यासाठी फायदेशीर आहे. त्यासोबतच यात कॅरोटीन, लायकोपीनसारखे तत्वही आहेत जे फील गुड हार्मोन्सची गुणवत्ता वाढवतात.
५) स्ट्रॉबेरी
चांगल्या चवीसोबतच स्ट्रॉबेरी लैंगिक जीवन आणखी रोमांचक करण्यासाठीही फायदेशीर मानलं जातं. स्ट्रॉबेरी या फळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे याच्या नियमीत सेवनाने प्रजनन क्षमता चांगली होते. एका शोधात खुलासा झाला आहे की, पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी अधिक फायदेशीर आहे.
६) कॉफी
कॉफीचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास याचे लैंगिक जीवनावर गंभीर परिमाण होऊ शकतात. पण कॉफीचं संतुलित सेवन केल्यास उत्तेजना वाढवण्यासाठी मदत होते.
७) डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेट एक असं सुपरफूड आहे जे केवळ कामेच्छाच वाढवत नाही तर याने लैंगिक क्षमताही वाढण्यास मदत होते. डार्क चॉकलेटमध्ये एल-आर्जिनिन आणि एमिनो अॅसिड असतं, जे लैंगिक क्षमता आणि कामेच्छा नैसर्गिक पद्धतीने वाढवण्यास मदत मिळते.
८) हिरव्या भाज्या
जर तुमच्या लैंगिक जीवनातील रोमांच संपला असेल तर आणि तो तुम्हाला परत मिळवायचा असेल तर पौष्टिक तत्व, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर हिरव्या भाज्यांचं सेवन करा. पालक, मोहरी, ब्रोकोली यांसारख्या हिरव्या भाज्यांचं सेवन अधिक करा. याने पुरुषांची प्रजनन क्षमता आणि शुक्राणूंचा गुणधर्म अधिक चांगला होतो.