अनेकदा तणाव दूर करण्यासाठी अनेकजण डेटिंग अॅपच्या जाळ्यात अडकून तरुण कॅज्युअल सेक्स करतात. काही वेळासाठी तणाव दूर करण्यासाठी भलेही असं करणं तुम्हाला चांगलं वाटत असलं तरी नंतर मन आणि शरीरासाठी हे फार घातक ठरु शकतं. खासकरुन महिलांमध्ये तर गिल्ट इतका जास्त वाढतो की, त्या आत्महत्येसारखं चुकीचं पाऊलही उचलतात.
काय असतो कॅज्युअल सेक्स?
ज्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवले जातात त्या व्यक्तीसोबत कोणतीही भावनिक जवळीकता नसताना, लॉंग टर्म नात्याचं कोणतही आश्वासन नसताना शारीरिक संबंध ठेवणे याला कॅज्युअल सेक्स म्हणतात. म्हणजे यात लोक केवळ क्षणीक आनंदासाठी जवळ येतात. इंटरनेटमुळे हे अधिक सोपं झालं आहे. वेगवेगळ्या डेटिंग अॅप्स, बाजारात उपलब्ध गर्भनिरोधक गोळ्या यामुळे तरुणाई याकडे अधिक आकर्षित होतात.
भावनांना पोहोचते हानी
शारीरिक संबंध आणि प्रेम तुमच्या भावनांना अधिक प्रभावित करतं. महिला भावनात्मक रुपाने कमजोर असतात आणि कॅज्युअल सेक्सनंतर त्या तेवढ्या आनंदी नसतात जेवढे पुरुष आनंद असतात. एका रिसर्चमध्ये असं आढळलं की, ८० टक्के पुरुष कॅज्युअल सेक्सनंतर आनंदी राहतात, तर केवळ ५० टक्के महिलांनाच असं करणं चांगलं वाटतं. कॅज्युअल सेक्सनंतर महिलांना दु:खं होतं, त्यांना पश्चाताप होतो. सोबतच त्यांना असंही वाटतं की, त्यांनी स्वत:चा वापर होऊ दिला गेला जे योग्य नाहीये. खासकरुन मुलींच्या मनात ही भावना अधिक येते की, त्यांचा वापर केला गेला.
बदलतो व्यवहार
जे लोक केवळ मजा म्हणूण शारीरिक संबंध ठेवतात त्यांना एका वेळेनंतर कुणाशीही कमिटमेंट करायची नसते आणि त्यांना केवळ शारीरिक संबंध ठेवायचे असतात. कॅज्युअल सेक्स केल्यानंतर अशा लोकांमध्ये नेहमी परिवर्तन बघण्यात आलं आहे. ते याच कारणासाठी पार्टनरचा शोध घेत असतात आणि कुणाशाही ते इमानदार राहू शकत नाहीत.
लैंगिक आजारांचा धोका
अनेकदा लोक कंडोमचा वापर न करताही शारीरिक संबंध ठेवतात. असं करणं आरोग्यासाठी योग्य नाही. याने सेक्शुअल ट्रान्समिटेड डिजीज होण्याचा धोका असतो. एड्स सारखा गंभीर आजारही तुम्हाला होऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शनही तुम्हाला होऊ शकतात.
नात्यांवरही पडतो प्रभाव
अनेकजण फार जास्त भावूक असतात. पण हे गरजेचं नाहीये की, तुमचा सेक्स पार्टनरही भावूक असावा. अशात जर तुम्ही अचानक शारीरिक संबंध ठेवल्याने कुणाशी भावनात्मक रुपानेही जुळता तेव्हा कॅज्युअल सेक्सपासून दूर राहिलेलंच बरं.